

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टीतील 'भीम संदेश पर्व' २०२५ या कार्यक्रमात आ. सुरेश धस
सहभागी झाले होते. आष्टीतील भीमजयंती महोत्सव आयोजन समितीच्यावतीने 'भीम संदेश पर्व
२०२५'चे आयोजन करण्यात आले होते.दोन दिवसांवर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची
जयंती आली आहे. या जयंतीनिमित्त हा सोहळा पार पडत आहे.या सोहळ्यात विविध सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आणि व्याख्यानांचे आयोजन केले होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उद्यानात सोहळ्याच्या निमित्ताने भीम गीतांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सपनाताई खरात यांनी उपस्थित सर्वांना
त्यांच्या गायकीने प्रभावित केले.विविध गीतांच्या माध्यमातून त्यांनी डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या जीवन प्रसंग आणि विचार सर्वांसमोर सादर केले.सात दिवस हा सोहळा पार
पडला. शेवटच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून या
सोहळ्याची सांगता होणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अरुणभैय्या निकाळजे,जयंती
महोत्सवाचे अध्यक्ष परिवंत गायकवाड, अरुण कांबळे,राहुल वाल्हेकर,सीताराम
घोडके,नगरसेवक भारत मुरकुटे,माजी नगरसेवक दीपक निकाळजे,माजी नगरसेवक मनोज
सुरवसे,राजू निकाळजे, ग्रामपंचायत अधिकारी नवनाथ लोंढे,ॲड. डी.एस.ससाणे यांच्यासह
भीमसैनिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या