Ticker

6/recent/ticker-posts

बावी येथील नारळी सप्ताहात ह.भ.प. महंत काशीनाथ महाराज यांचे काल्याचे कीर्तन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील नागतळा येथील श्री क्षेत्र गणेशगड व श्री नागनाथ देवस्थानचा १३ वा.नारळी सप्ताह तालुक्यातील श्री क्षेत्र बावी,दरेवाडी येथे होत आहे. या सप्ताहात ह.भ.प. महंत काशीनाथ महाराज यांचे रविवारी काल्याचे कीर्तन होणार आहे. या सप्ताहातील काकडा भजन, विष्णु सहस्त्रनाम, गाथा भजन, ज्ञानेश्वरी भाव कथा, हरिपाठ,हरिकिर्तन व जागर होत आहे. ह.भ.प.महंत जगन्नाथ महाराज शास्त्री यांची ज्ञानेश्वरी भाव कथा झाली.सप्ताहात सकाळी ९ ते ११ यावेळात ह.भ.प. महंत सुदर्शन महाराज,ह.भ.प. विष्णु महाराज लिंबोडीकर,ह.भ.प.आजिनाथ महाराज आंधळे,ह.भ.प.महंत कृष्णा महाराज, ह.भ.प.महंत अशोक महाराज थोरे, ह.भ.प.महंत जगन्नाथ महाराज शास्त्री,ह.भ.प. वेदांतचार्य राम महाराज शास्त्री (आळंदी) यांचे सकाळी तर रात्री ह.भ.प.विवेकानंद शास्त्री,ह.भ.प. विशाल महाराज खोले,ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर,ह.भ.प. मंगेश महाराज दाताळकर,ह.भ.प. उमेश महाराज दशरथे,ह.भ.प. सोपान महाराज सानप,महंत आजिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गडकर याचे कीर्तन झाले. रविवार दि. १३ एप्रिल २०२५ रोजी काल्याचे कीर्तन होणार आहे. काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाची पंगत होणार आहे.यापूर्वी कारखेल खु.सुरुडी, नाकाडेवाडी, खडकवाडी,मोराळा (नागझरी), वनवेवाडी, तांबडेवस्ती, पाटसरा,कापसी, नागनळा,डोईठाण, धनगरवाडी येथे नारळी सप्ताह झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या