Ticker

6/recent/ticker-posts

संविधान प्रचारक प्रा.मुक्ता कदम यांचे व्याख्यान

आष्टी (प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी.सार्वजनिक जयंती महोत्सव तथा भीम संदेश पर्व-२०२५ अंतर्गत आज शनिवार दि.१२ एप्रिल २०२५ रोजी सायं.७ वा.आष्टीत संविधान प्रचारक तथा पत्रकार प्रा.मुक्ता कदम यांचे व्याख्यान होणारा आहे. आष्टी शहरातील भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होत आहे.भीम संदेश पर्व २०२५ महोत्सव हा सार्वजनिक जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवात रविवार दि.६ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध व्याख्याते तथा पत्रकार प्रा.संजय औटे सर यांचे व्याख्यान,सोमवार दि.७ एप्रिल रोजी परिवर्तनवादी कीर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांचे व्याख्यान,मंगळवार दि.८ एप्रिल रोजी सप्तखंजिरी वादक,समाज प्रबोधनकार डॉ.रामपाल महाराज यांचा कार्यक्रम झाला आहे.बुधवार दि.९ एप्रिल २०२५ रोजी युगक्रांती सास्कृतिक युवा मंच,शाहिरी जलसा आकाश पवार यांचा कार्यक्रम,गुरुवार दि.१० एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सपना खरात यांचा कार्यक्रम झाला आहे.आज शुक्रवार दि.११ एप्रिल २०२५ रोजी आष्टी येथील संगीतकला साधना मंडळाचे मार्गदर्शक संगीत विशारद आदिनाथ औटे सर व सर्व कलाकार यांचा संगीत भजन झाले.आज शनिवार दि.१२ एप्रिल २०२५ रोजी संविधान प्रचारक तथा पत्रकार प्रा.मुक्ता कदम यांचे व्याख्यान होणार आहे. सोमवार दि.१४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० वा.मुख्य निलध्वजारोहन व बुद्ध वंदना होणार आहे.यावेळी कालकथित रघुनाथ निकाळजे बंधु स्मृती पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे अशी माहिती सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सरपंच परिवंत गायकवाड व पदाधिका-यांनी दिली.
चौकट -------- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक जयंती महोत्सव तथा भीम संदेश पर्व -२०२५ अंतर्गत अष्टीकरांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आणि कलावंतांच्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आस्वाद घेता येणार आहे.आष्टीकरांसाठी ही अलौकिक पर्वणी आणि मेजवानी असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव उत्स्फूर्त साजरा करण्यासाठी प्रतिसाद द्यावा असे आवाहन अध्यक्ष परिवंत गायकवाड व संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या