Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्यदक्षता ही गुरुजनांची शिकवण ---पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे ----------------------- एकता फाउंडेशनच्यावतीने सत्कार; यशस्वी विद्यार्थी शिक्षकाची संपत्ती ......... प्रा.बिभिषण चाटे

आष्टी (प्रतिनिधी‌) आदर्श शिक्षक हा खेड्याचा आदर्श समाजसेवा असला पाहिजे अशी कर्मवीर भाऊराव पाटलांची भूमिका होती.शिक्षण हा माणसाच्या जीवनाचा पाया आहे असे सांगून कर्तव्यदक्षपणा,बंधुत्व,एकता ही मूल्यं गुरुजनांची शिकवण आहेत अशा भावना पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी व्यक्त केल्या.महाराष्ट्र राज्य एकता फाउंडेशन आणि कनिष्ठ महाविद्यालय मराठी भाषा विषय शिक्षक महासंघाच्या वतीने तसेच वकील संघाच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपामध्ये नूतन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना नेवासा येथील परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे बोलत होते.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव,सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. संजय सानप,एकता फाउंडेशनचे पदाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे बीड जिल्हा सचिव प्रा.बिभिषण चाटे, सार्थक चाटे आदीसह यांची उपस्थिती होती.पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे पुढे म्हणाले, "प्रा.चाटे सरांनी केलेला हा ह्रदय सत्कार माझ्यासाठी शाब्बासकीची थाप असून हा सन्मान भविष्यातील चांगल्या कार्यकर्तृत्वासाठी बळ, शक्ती आणि ऊर्जा देईल हा मला विश्वास आहे.ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.संजय सानप यांनी शिक्षक हा नव समाजाचा शिल्पकार असतो.नव समाज निर्मितीमध्ये शिक्षकाचा सिंहाचा वाटा असतो असे सांगत सर्वसामान्य गरीब कुटुंबातून पोलीस अधीक्षक पदापर्यंत जाण्याची मजल ही त्यांच्या आई-वडिलांचे प्रचंड कष्ट आणि संतोष खाडे यांनी घेतलेली मेहनत याचे फळ आहे.त्यांची ही कारकीर्द भविष्यात सर्वसामान्य माणसांच्या रक्षण आणि न्यायासाठी असेल अशी अपेक्षा केली. चौकट --------- यशस्वी विद्यार्थी ही शिक्षकाची संपत्ती --------------------------- शिक्षण हे आईच्या दुधासारखे असते.आंतरिक प्रेरणेने झालेले संस्कार चिरंतन ठरतात.दिव्याने दिवा पेटवावा' त्याप्रमाणे संतोष खाडे यांच्या प्रेरणेतून अनेक यशस्वी दीपमाला तयार झाल्या.चरित्रवान,सुसंस्कृत आणि संतोष यांच्या सारखे गुणवंत,मेहनती विद्यार्थी हीच कोणत्याही शिक्षकाची संपत्ती असते! --- प्रा.बिभिषण चाटे ( बीड जिल्हा सचिव,मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य ) ------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या