Ticker

6/recent/ticker-posts

मातकुळीच्या श्रीकृष्ण विद्यालयाचे संगीत गायन परीक्षेत सार्थक जरे व सोहम सोनवणे तालुक्यातून प्रथम

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील श्रीकृष्ण विद्यालयातील गणित व क्रीडा जेष्ठ शिक्षक अशोक डोके सर यांनी पुढाकार घेऊन प्रथमच विना शुल्क (मोफत) संगीत गायन शिक्षण सुरू केले आहे. आत्तापर्यंत २३ विद्यार्थी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबईच्यावतीने घेण्यात येणाऱ्या संगीत गायन परीक्षेसाठी बसलेले आहेत.या विद्यार्थ्यांना दहावीला १५ गुण मिळणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे.१४ विद्यार्थ्यांनी संगीत गायन पहिली परीक्षा दिली होती.यामध्ये सार्थक विठ्ठल जरे (रा.मातकुळी) व सोहम साईनाथ सोनवणे (इयत्ता नववी) रा.मातकुळी हे दोन विद्यार्थी आष्टी तालुक्यातून प्रथम आले आहेत. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.पहिल्याच वर्षी संगीत गायन परीक्षेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे, डॉ.अजयदादा धोंडे,संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.डी. बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते सर,माऊली बोडखे, संजय शेंडे, मुख्याध्यापक गोरक्षनाथ सरकाळे, मातकुळीचे सरपंच बबन डोके,उपसरपंच विशाल जरे,शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी सरपंच आप्पासाहेब जरे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार गहिनीनाथ पाचबैल,सुधाकर डोके (काका), अनिल पाटील,शेषराव आढाव,सेवा सोसायटीचे चेअरमन भरत डोके,शाळेतील सर्व शिक्षक व पालक संगीतप्रेमीनी अशोक डोके सर यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या