Ticker

6/recent/ticker-posts

विकास शिरसाठ यांचा मराठी भाषा शिक्षक महासंघाच्या वतीने सत्कार

आष्टी (प्रतिनिधी‌) एस.टी.महामंडळामध्ये दोन दशकांपासून अधिक काळ अत्यंत कर्तव्यदक्ष कर्तव्य पुर्तीबद्दल महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्यावतीने चालक विकास शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने समाजातील विविध चांगुलपणाच्या बाबींवर प्रकर्षाने लक्ष ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करते.अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी महामंडळातील कर्तव्यदक्ष चालक विकास शिरसाठ यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी भविष्यात आपण यापुढेही उत्कृष्ट कर्तव्य सेवा करू असा विश्वास एस टी महामंडळातील वरिष्ठ कर्मचारी विकास शिरसाठ यांनी यावेळी व्यक्त केला. ------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या