Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार जेंव्हा लूक चेंज करतात..!

आष्टी (प्रतिनिधी‌) दैनंदिन कामकाजा मध्ये सातत्याने व्यस्त असताना केवळ आणि केवळ आपल्या शब्द आणि लेखणीच्या सानिध्यात राहत जनसामान्यांच्या बातम्या लिहिण्यात आयुष्य अर्पण करावे लागते.हे करताना स्वतःकडे लक्ष देण्यास पत्रकार बांधवांना वेळ नसतो.यातून अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन पत्रकारांना बलिदान द्यावे लागण्याच्या अनेक घटना आहेत. परंतु अशाही वेळी अल्पवेळेत एक विरंगुळा म्हणून धार्मिक क्षेत्रावर देवदेवतांना आशीर्वादासाठी नतमस्तक झाल्यानंतर काही वेळेसाठी का होईना एक वेगळा पोशाख परिधान करून आनंद घेण्याचा मोह पत्रकारांना आवरता आलेला नाही...! बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पत्रकार श्रंखलेमधील ज्येष्ठ पत्रकार दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे आणि आष्टी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व पत्रकार प्रा.डॉ. विनोद ढोबळे यांनी नुकतेच महाकालेश्वर देवस्थानाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. या दरम्यान त्यांनी तेथील एका कपडा व्यापाऱ्यांकडून अध्यात्माला धरून असलेल्या पोषकाची खरेदी केली.या पोषकांनी त्यांचा लूक अर्थातच प्रचंड चेंज झालेला दिसून आला ! यावेळी त्यांनी दोघांचा आवर्जून एकत्र फोटो घेतला!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या