आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील आदर्शगाव आनंदवाडी,
सराटेवडगाव येथील शिक्षक तथा सांगवी पाटण येथील सुदर्शन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक साईनाथ कारभारी बोडखे सर यांच्या मातोश्री अंजनाबाई कारभारी बोडखे (वय ९२) यांचे वृध्दापकाळाने बुधवार दि.१९ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले. मातोश्री स्व.अंजनाबाई या जुन्या पिढीतील सुसंस्कारित माळकरी वारकरी,महिला होत्या.लोकसंस्कृती जपणाऱ्या शांत,संयमी व अध्यात्म विचाराच्या होत्या.लोक साहित्याचा अनमोल ठेवा त्यांच्याकडे होता.जात्यावरचे गीते,नागपंचमीचे गीते,हळदी प्रसंगी म्हटली जाणारी गीते, लग्न विधी गीते अशा अनेक लोकगीतांचा खजिना स्व. अंजनाबाई यांच्या रूपाने काळाच्या पडद्याआड गेला. अंत्यत गरिबीतून कुटूंब सधनतेकडे घेऊन जाण्यात त्यांचा मोठा वाटा होता.त्यांचा थोरला मुलगा अंबादास बोडखे याचे दोन वर्षापूर्वी निधन झाले आहे.त्यांच्या पाठीमागे मुलगा मुख्याध्यापक साईनाथ बोडखे सर,मुलगी सौ.चंदाबाई भाऊसाहेब विधाते,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.प्रा.डॉ.जी.पी.बोडखे व सतिश बोडखे सर यांच्या चुलती होत्या.अंत्यविधीस माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ.भीमराव धोंडे यांचे बंधू राजेंद्र धोंडे,रूईनालकोलचे माजी सरपंच संजय नालकोल,प्रा.डाॅ.संजय धोंडे,राजीव गांधीं विद्यालय कापुरवाडी,
अहिल्यानगरचे मुख्याध्यापक बाळासाहेब दुसुंगे,बाळासाहेब बेरड,महावीरशेठ सुराणा,पिंपळा,शेख महेबुब फौजी,पाडूरंग खराडे,सुरेश खराडे,दिलीप नवले,नवनाथ गदादे,संपत गोरे,संतोष आस्वर,चेअरमन बबन नन्नवरे,चेअरमन राजाराम नन्नवरे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्रशासन अधिकारी माऊली बोडखे माजी सरपंच डॉ.राम बोडखे,पांडुरंग धोंडे,सरपंच भीमराव बोडखे,सेवानिवृत्त पीएसआय शेख अन्सारभाई,इंजि.पी.बी.बोडखे,नारायण बनसोडे,निवृत्ती बनसोडे,शिवाजी गवारे,मोहन बांगर,सुभाष बनसोडे,ह.भ.प. निवृत्तीदादा बोडखे,राजेंद्र सायबर,माळशिखरे,बाळासाहेब राऊत,दत्तात्रय विधाते,
कोंडीभाऊ झांबरे,रंगनाथ बोडखे,वनसिंग बोडखे,चेअरमन भानुदास बोडखे,सोमनाथ सुबंरे,भाऊ तरटे,

सतिश आळेकर,श्रीगोंदा,संतोष जाधव,संजय जाधव आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या