आष्टी (प्रतिनिधी)
गेल्या दहा वर्षांत या कापशी तलावाची उंची वाढवण्याचे काम झालेले नाही.कापशी तलावाचे उंची वाढवण्याचे काम झाले असते तर या गावातील कमीत कमी ५० कोयते ऊस तोडायला गेले नसते.त्यामुळे स्थलांतरणाचे प्रमाण कमी झाले असते.आता या तलावाची उंची वाढवून २५० हेक्टर जमिन ओलीताखाली येणार असल्याने गावक-यांनी या कामांसाठी हेवेदावे बाजूला ठेऊन एकत्र येऊन सहकार्य करावे असे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले आहे.
आष्टी तालुक्यातील कापशी येथे मृद व जलसंधारण विभाग बीड,१०० ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेचा शुक्रवार दि.१४ रोजी सकाळी ११ वा.साठवण तलावाचे गणेशगडाचे महंत ह.भ.प.काशीनाथ महाराज व धर्मराज गडाचे महंत ह.भ.प.रोहिदास गर्जे महाराज यांच्याहस्ते भूमीपुजन करण्यात आले.
यावेळी आ.सुरेश धस बोलत होते.यावेळी जि.प.सदस्य अमर निंबाळकर आष्टी तालुका दुध संघाचे चेअरमन संजय गाढवे,माजी सभापती छत्रगुण मरकड,एन.टी.गर्जे,नारायण वनवे,बाबु गर्जे,नवनाथ गर्जे,नवनाथ नागरगोजे,लक्ष्मण ननवरे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ.सुरेश धस म्हणाले,मला विकासाच्या कामात टिका टिप्पणी करायची नाही पण दहा वर्षांत मतदार संघाला दोन आमदार झाले.त्यांना हा कापसीचा तलाव का दिसला नाही जर हा तलाव झाला असता तर किमान ५० कोयता तोडणारांची संख्या कमी झाली असती आता शेतक-यांनी या तलावासाठी शेतक-यांनी सहकार्य करून एका वर्षात तलावाचे काम मार्गी लावतो.हा साठवण तलाव अतिशय नॅचरल साइटवर असून या साठवण तलावामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम होणारा असून कापसी परिसरातील क्षेत्र ओलीताखाली जाणारा असल्याने मला मनस्वी आनंद होत असून अनेक दिवसाचे ही मागणी आज पूर्णत्वाकडे जात असल्याने गाव पुढा-यांनी गावातील तलावाच्या अडचणी सोडवा प्रशासकीय अडचणी मी सोडतो असा शब्दही आ.


सुरेश धस यांनी दिला.ह.भ.प.काशीनाथ महाराज म्हणाले,आमदार सुरेश धस यांची मतदार संघात नाळ जुळलेली आहे.त्यांनी विकासाचे राजकारण केले व करत आहेत.विकासाचं दृष्टिकोन असलेलं हे व्यक्तिमत्व आहे.यावेळी आष्टी तालुका दुध संघाचे व्हाईस चेअरमन अशोक गर्जे,माजी सरपंच सुंदरलाल गर्जे,सरपंच महाडिक,सरपंच नंदकिशोर करांडे,सरपंच विकास पवार,सरपंच अशोक इथापे,फारुख मामा,बबन तरटे,शेषराव गर्जे फौजी,पोपट गर्जे,रेवननाथ खाडे,मारुती डिसले,नितीन नाकाडे,वैभव गोल्हार,धनंजय तरटे,शिवाजी गर्जे,काकासाहेब गर्जे,आश्रुबा खलाटे,माणिक दहिफळे,अशोक तरटे,श्रीराम केदार आदीसह कापसी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या