Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षण आणि संस्काराचा ध्यास घेतलेला प्रमाणिक अध्यापक ........... प्रा.डॉ.आत्माराम झिंजुर्डे

आष्टी (प्रतिनिधी‌) एक सर्वसामान्य गरीब होतकरू शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना सातत्याने सर्वकाळ मार्गदर्शक म्हणून आणि आदर्श गुरु स्पष्ट वक्ते आणि एक विश्वासू मित्र म्हणून त्याच समवेत बंधुतुल्य व्यक्तिमत्व आणि आदरणीय अध्यापक अशी प्रतिमा निर्माण केलेले प्राध्यापक डॉ.आत्माराम झिंजुर्डे यांच्याकडे पाहिले जातेय.रसाळ वाणी,अध्यात्मचिंतन परमार्थाची गोडी आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान घेऊन अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये एक आवडीचा छंद म्हणून जोपास णारे ते एक आहेत.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून करत असलेले कार्य त्यांच्या मातृभाषेवरील प्रेमाची साक्ष देते.नुकताच त्यांचा महाराष्ट्र राज्य एकता फाउंडेशनच्यावतीने संस्थापक अध्यक्ष साहित्यिक कवी अनंत कराड यांनी आर्वी येथील शांतीवन सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला.कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्राध्यापक सुनील डिसले,कार्याध्यक्ष प्रा.संपतराव गर्जे,डॉ.मनीषा रिठे मॅडम,राज्य सचिव प्रा.बाळासाहेब माने, यांनी प्रा.डॉ.आत्माराम झिंजुर्डे यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते सक्षम निभवतील असा विश्वास व्यक्त केला आहे. चौकट ------- शिक्षण क्षेत्रामध्ये गेले अठरा वर्षे सातत्याने आश्रम शाळेमध्ये विना वेतन काम केल्यानंतर निराश होऊन शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी नुकतीच आत्महत्या केली आहे.या दुर्दैवी घटने बद्दल तीव्र दुःख व्यक्त करून कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाने श्रद्धांजली अर्पण केली आहे असे बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉक्टर अशोक देवगुडे आणि जिल्हा सचिव प्रा.बिभिषण चाटे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या