आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन आष्टी तहसील कार्यालयामध्ये मंगळवार दि.२५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आष्टीच्या तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील यांनी केले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी दि.१७ मार्च रोजी प्रेस नोट जारी केली आहे.त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग,बीड जिल्हाधिकारी कार्यालय यांचे निर्देशाप्रमाणे मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच नियम १९६४ मधील नियम ३ (अ) प्रमाणे तालुक्यातील सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी,समांतर प्रवर्गासाठी आगामी पाच वर्षाकरिता सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी गठीत होणाऱ्या ग्रामपंचायती करता सरपंचपदासाठी सोडत पद्धतीने आरक्षण कार्यक्रम दि.२५ मार्च
सकाळी ११ वा.आष्टी तहसील कार्यालय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.आष्टी तालुक्यातील आगामी १२५ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम यामध्ये जाहीर होणार आहे.
यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या