Ticker

6/recent/ticker-posts

महेश (कडा) सहकारी कारखाना बँकेकडून संचालक मंडळाच्या ताब्यात ........... गेलेले वैभव पुन्हा निर्माण करायचे आहे सर्व राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांनी चांगली भावना ठेवून महेश साखर कारखान्याला सहकार्य करावे ......... माजी आ.भीमराव धोंडे

आष्टी (प्रतिनिधी) महेश (कडा) सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांची कामधेनु आहे कारखान्याचे गतवैभव परत आणायचे आहे यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.भविष्यात कमी कर्मचाऱ्यांना घेऊन अत्याधुनिक पद्धतीने कारखाना चालवणार आहोत.गेलेले वैभव पुन्हा निर्माण करायचे आहे सर्व राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांनी चांगली भावना ठेवून महेश साखर कारखान्याला सहकार्य करावे असे आवाहन माजी आ. भीमराव धोंडे यांनी व्यक्त केले. मागील १९ वर्षांपासून बंद असलेला महेश (कडा) सहकारी साखर कारखाना बॅंकेने कर्ज असल्यामुळे जप्त केला होता परंतु आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विशेष सहकार्याने बॅंकेचे कारखान्यावरील थकीत कर्ज कायदेशीर प्रक्रियाने भरुन महाराष्ट्र सहकारी बँकने संचालक मंडळाकडे कारखान्याचा ताबा दिला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्राधीकृत अधिकारी चित्रसेन लोमटे यांनी माजी आ.भीमराव धोंडे, चेअरमन राजेंद्र धोंडे,प्रभारी कार्यकारी संचालक सोपान मुळे,डाॕ.अजयदादा धोंडे,चेअरमन राजेंद्र धोंडे,नियामत बेग,अशोक साळवे,पांडुरंग गावडे, पांडुरंग नागरगोजे, राजाराम नन्नवरे,मोहन घुले,सुनिल शिंदे,सदा पाटील दिंडे,दादा जगताप,विठ्ठल लांडगे,अंकुश मुंढे,सरपंच सावता ससाणे,बँकेचे द्वितीय श्रेणी अधिकारी बाळासाहेब जेवे,बबनराव उगले, अनिकेत कोठेकर,सभापती काकासाहेब लांबरुड,हाज्जुभाई शेख,आण्णासाहेब लांबडे,बजरंग कर्डीले,उत्तम बोडखे,माजी सभापती बाबासाहेब आंधळे,शिवाजी थोरवे,सोनाजी गांजुरे, मोहन घुले,कचरु भुकन,सौ.दैवशाला शिरोळे,चेअरमन कुंडलिक आस्वर आदी उपस्थित होते. माजी आ.भीमराव धोंडे,युवा नेते अजयदादा धोंडे सर्व संचालक मंडळ आणि उपस्थित शेतकऱ्यांनी संपूर्ण कारखान्याची झालेली दुरावस्था फिरून पाहिली.संचालक मंडळ आणि शेतकरी यांच्याशी संवाद करताना माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले की,माझा जन्मच पाचराटात झाला आहे.मी लहान असताना आमच्याकडे २५ एकर ऊस होता. तेव्हापासून मला ऊसाची आणि कारखान्याची आवड आहे.मी वैयक्तिक कारखाना घेऊ शकलो असतो परंतु सहकारी कारखाना ताब्यात घेऊन जनतेचा विश्वासघात करायचा नाही. बंद पडलेली कामधेनू आता सुरू होणार असून ३० टक्के महिलांना कारखान्यात काम देणार आहोत.शेतकऱ्यांनी ८००५ या जातीच्या उसाची पट्टा पद्धतीने लागवड करावी.
आष्टी तालुक्याला कुकडीचे पाणी आले आहे.खुंटेफळ साठवण तलावात देखील लवकरच येणार असून त्या पाण्याने तालुक्यातील इतर तलाव भरून तालुक्यात सर्वत्र पाण्याची सोय करण्यात येईल त्यामुळे भविष्यात उसाचे क्षेत्र वाढणार आहे.समुहाला बरोबर घेऊन जाण्याची सवय लहानपणापासून आहे.कारखाना प्रामाणिकपणे चालावायचा आहे.आष्टीला दुष्काळी भाग म्हणून बाहेरचे लोकं हिणवायचे पण आता गेलेले वैभव पुन्हा निर्माण करायचे आहे.चांगली भावना ठेवून शेतकऱ्यांनी कारखान्याला सहकार्य करा असे आवाहन माजी आ.भीमराव‌ धोंडे यांनी केले.कारखाना महाराष्ट्र सहकारी बँक २००७ साली जप्त केला होता.३५ कोटी रुपये कर्ज होते. ओटीएस योजनेअंतर्गत कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करीत १८ कोटी ५० लाख रुपये संचालक मंडळाने बॅंकेकडे भरणा केला असून संचालक मंडळाच्या ताब्यात कारखाना देत असल्याचे बॅकेच्या अधिका-यांनी सांगितले.उपस्थितीतांचे नियामत बेग यांनी आभार मानले. चौकट ------- आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू महेश (कडा) सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्य बँक तात्काळ एकरकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत महेश (कडा) सहकारी साखर कारखान्याने सहभाग घेऊन मंजुर तडजोड रक्कमेचा भरणा करुन आज शुक्रवारी कारखान्याचा ताबा घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या