आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा भवरवाडी (किन्ही) या शाळेत पहिली ते चौथी या चार वर्गात ३० विद्यार्थी आहेत.येथे मुख्याध्यापक सुनिल काकडे तर सहशिक्षक म्हणून अनिल बेद्रे आहेत,अनिल बेद्रे हे शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबर सर्व विद्यार्थीचे सुंदर हस्ताक्षर होण्यासाठी विशेष परिश्रम घेतात.या शाळेला माजी नगरसेवक दिपक निकाळजे व जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी भेट दिली.शाळेतील विद्यार्थीची चाचणी घेत शैक्षणिक गुणवत्ता तपासली.या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर आहे.पाठांतर,पाठे पाठांतर,ईग्रंजी वाचन चांगले आहे.प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळत आहे. शाळेतील सर्व विद्यार्थीना कॕलेग्राफी साठी ३०० रु किंमतीचे पेन सरपंच भरत भवर यांनी दिले आहेत.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण भवर,संतोष भवर आदि उपस्थित होते.
येथे ५५ ते ६० वर्षापूर्वीची जुनाट आशी दोन खोल्यांची शाळेची ईमारत आहे.ही ईमारत विद्यार्थीना बसण्यायोग्य नाही.येथे इमारत होणे गरजेचे आहे.शाळेतील विद्यार्थीचा दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला जातो. १०० ते १२५ घरे असलेली ही वाडी आहे मात्र जागरुक पालकांमुळे प्राथमिक शाळेत दर्जेदार ज्ञानदानाचे कार्य शिक्षक करत आहेत,ग्रामस्थांचा लोक सहभाग व शाळेला मदत करण्याची भुमीका असल्याने विविध शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात.पालक,ग्रामस्थांच्या सहभागातुन शाळेत नुकतीच शिवजयंती साजरी झाली.यानिमित्ताने तीन तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
यावेळी पालक व ग्रामस्थांनी सढळ हाताने विद्यार्थीना बक्षीसे दिली. ४० हजार रु जमले आहेत.सरपंच ज्या शाळा खोलीत शिकले ती ईमारत आता नादुरुस्त झाल्याने येथे सुमारे १५ ते २० लाख रु खर्चुन दोन खोल्या स्लॕबच्या आरसीसीच्या बांधण्याचा सरपंच भरत भवर,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थांचा प्रयत्न सुरु आहे.मुख्याध्यापक
सुनिल काकडे हे ९ वर्षापासून या शाळेत आहेत तर अनिल बेद्रे सर हे दोन वर्षापासुन येथे कार्यरत आहेत.भवरवाडीची प्राथमिक शाळा ही मोत्यांच्या अक्षरांची शाळा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
चौकट
--------
सुंदर हस्ताक्षरासाठी
विशेष परिश्रम!
--------------
मुख्याध्यापक सुनिल काकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बेंद्रे सरांनी विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी विशेष परिश्रम घेतले अधिकचा एक तास दिल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे जवळपास हस्ताक्षर सुंदर झाले.
सांस्कृतिक
कार्यक्रमात अव्वल!
----------------


भवरवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा ही तशी छोटी आहे.इमारत मध्यमच असल्याने परंतु विद्यार्थी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करतात.गुणवत्ते बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ही उत्स्फूर्त भाग घेतात.याचाच परिपाक म्हणून दरवर्षी होणारे स्नेहसंमेलन हे त्यांच्या कलागुणांची सादरीकरणातील उत्कृष्ट कलाकृती होत असून सांस्कृतिक कार्यक्रमांचा एक वेगळा ठसा या परिसरात या शाळेने उमटवीला आहे.
0 टिप्पण्या