Ticker

6/recent/ticker-posts

धनश्री पतसंस्थेला ५४ लाख रूचा नफा तर ३४ कोटीचे कर्ज वाटप ...... चेअरमन रंगनाथ धोंडे

आष्टी(प्रतिनिधी) २५ वर्षापासून ३१ मार्च रोजीच ताळेबंद जाहिर करणारी आष्टी शहरातील धनश्री पंतसंस्थने याहीवर्षी आपला ताळेबंद जाहिर केला आहे.यावर्षी पतसंस्थेस ५४ लाख रूपायांचा नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन रंगनाथ धोंडे यांनी दिली आहे. चेअरमन धोंडे हे पत्रकारांशी बोलत होते.यावेळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन एल.जी. सुरतवाले,सचिव जितेंद्र शिंदे यांच्यासह पतसंस्थेचे संचालक व अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना रंगनाथ धोंडे म्हणाले,सन २०२४-२०२५ यावर्षा अखेर पतसंस्थेत ४४ कोटी रूपायांची ठेवी,कर्ज वाटप ३४ कोटी ७ लाख ८८ हजार ८२४ असून,गुतंवणूक कोटी २२ लाख ४५ हजार ९४९ तर संस्थेचा स्वनिधी ७ कोटी ४४ लाख ८ हजार २८ रूपायांचा जमा झाला आहे. त्यामधून संस्थेस यावर्षी ५४ लाख २५ हजार ६७ रू नफा झाला आहे. गेल्या २५ वर्षात संस्थेने शहरात विविध समाजउपयोगी कामे केली असून,मोठ्या प्रमाणात वृृक्ष लागवड ते जोपासण्याचे कामही संस्थेने केले असल्याचे चेअरमन रंगनाथ धोंडे यांनी सांगीतले. चौकट ———— गेल्या २२ वर्षात आम्ही आमच्या पतसंस्थेचा ताळेबंद ३१ मार्च लाच जाहिर करत आलो आहोत.आमच्यावर ठेवीदार,कर्जदार, सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर आम्ही संस्थेची प्रगती करू शकलो. -------
जितेंद्र शिंदे (सचिव धनश्री पतसंस्था आष्टी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या