
आष्टी (प्रतिनिधी)
देशभरात २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन उत्साहात साजरा केला जातो.या वर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विश्वास चव्हाण यांनी फक्राबाद, तालुका जामखेड येथील निसर्ग अभ्यासक,संशोधक,वन्यजीव छायाचित्रकार रणजित रावसाहेब राऊत यांना "VishwaSutras: Universal Principles for Living" हे त्यांनी लिहिलेले बेस्ट सेलर पुस्तक आशिर्वाद संदेश लिहून व स्वाक्षरी करून भेट दिले.त्यांनी पीएच.डी.नंतरच्या उच्च शिक्षणाच्या संधी आणि परदेशात संशोधन करण्याच्या संभाव्य मार्गांबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.चव्हाण यांनी जागतिक स्तरावर संशोधन आणि नवसंशोधनाच्या वाढत्या संधींबाबत मार्गदर्शन करताना,राऊत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्ती आणि संशोधनाच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
संशोधन क्षेत्रात आपले योगदान देण्यासाठी तरुण संशोधकांनी प्रयत्नशील राहावे असे मत त्यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने हा सन्मान मिळाल्याने रणजित राऊत यांनी समाधान व्यक्त केले आणि आपल्या पुढील संशोधन कार्यात त्याचा उपयोग करून घेण्याचा संकल्प केला.
0 टिप्पण्या