
आष्टी (प्रतिनिधी)
मानवाच्या स्वभावात 'त्याग' हा सदुन असण्याची गरज असते.सामाजिक बांधिलकी जोपासून उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील असू तर आदर्श प्रस्थापित होऊ शकतो! या मूल्यांवर विश्वास ठेवून सदैव गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करण्यासाठी..गणिताला सोपे करून सर्वच विषय आवडीचे करणारा..एक गुन्निजण शिक्षक म्हणून विठ्ठल जायभाये यांच्या नावाची बीड जिल्ह्यात एक वेगळी क्रेझ आहे.आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलावात असतो.केवळ गुणवत्ता नव्हे;तर सामाजिक दायित्वाची ही गरज असते.याची सदैव जाणीव विठ्ठल जायभाये यांनी ठेवली.बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील काकडहीरा या अत्यंत छोट्या खेड्यामध्ये विठ्ठल लहानाचे मोठे होताना जिल्हा परिषदेच्या शाळेतून पुढे आले.घरची परिस्थिती ऊसतोड कामगार असल्याने चिंता होतीच परंतु त्यावर मात करून नवे क्षितिज गाठण्याची त्यांच्या त ऊर्जा सुद्धा होती. प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी डीएड करून शिक्षकाची नोकरी घेतली.स्पर्धा परीक्षातून यश आजमावण्याच्या प्रयत्नात असतानाच गरिबीमुळे त्यांना संसाराचा गाडा पुढे नेणे सुद्धा क्रम प्राप्त होते आणि म्हणूनच त्यांनी चरितार्थ भागवून अध्यापनाच्या कार्याला मनापासून सुरुवात केली. दुःखाने माणसाच्या मनाचा तोल जातो असे वि.स.खांडेकर म्हणतात.त्या स्तव त्यांनी मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्या श्रेष्ठ असतो हे जाणीव ठेवून शिक्षण या पवित्र क्षेत्राला कायम पवित्र ठेवण्याच्या दृष्टीने खारीचा वाटा उचलला..डोक्यावरचे ओझे उतरवता येईल पण मनावरचे ओझे उतरता येत नाही' ही जाणीव ठेवत त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना मदत करण्याचा वसा घेतला.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी अनेक गरीब होतकरू मुला-मुलींना स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केल्याचे वास्तव आहे.आयुष्यात नवचैतन्याचे रंग भरावे सुखाचे अभिनंदन व्हावे..ही भूमिका त्यांनी मांडली. बीड येथील जिल्हा परिषदेच्या ज्ञान मंदिरात त्यांनी अध्यापनाचे पवित्र कार्य करून इतिहास रचला आहे.संत जनाबाईंनी अभंगातून ज्याप्रमाणे अहंकाराची होळी करण्याचा संदेश दिला. त्याप्रमाणे शिक्षणातून समता बंधुत्व आणि ऐक्य सर्वधर्म समभावाची मूल्य जतन करण्यासाठी त्यांनी संस्काराची पेरणी केली.आज त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर नावारूपाला आले आहेत.स्वतः त्यांचा एक मुलगा एमबीबीएस;तर दुसरा आयआयटीच्या मार्गान आहे.त्यांच्या सुविद्य पत्नी गीतांजलीताई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. नॉलेज प्लांटच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेले रोपटे विशाल वर्षाकडे वाटचाल करीत आहेत.आज अशा या उपक्रमशील संवेदनशील चैतन्यदायी पवित्र मनाच्या या दांपत्यासह गणित विषयाचे तज्ञ,आदर्श शिक्षक,गुणवंत व्यक्तिमत्व विठ्ठल जायभाये सरांना अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉ.आत्माराम झिंजुर्डे,जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.अशोक देवगुडे बीड जिल्हा सचिव प्रा.बिभिषण चाटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या