Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुक्यात पारगांव जो.येथे पहिला " ग्राम दरबार " उपक्रम संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) शासनचे आदेशाने विभागीय आयुक्त,विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र/जान/विशा/ नियो-०१/दि. २० फेब्रुवारी २०२५ नुसार आष्टी तालुक्यात पारगांव जो.येथे पहिला " ग्राम दरबार " उपक्रम संपन्न झाला.भारतातील ६५ टक्के लोकसंख्या आजही ग्रामीण भागात राहत आहे.ग्रामीण भागातील पुनरुत्थानासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले गेले आहेत. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील खेडी स्वयंपूर्ण,स्वयं शासीत असावीत अशी सर्व ग्रामस्थांची अपेक्षा असते.शासनाच्या विविध योजना,उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहचविणे हेच सुप्रशासनाचे लक्षण आहे. याच मुद्दावर आधारीत ग्रामीण भागात काम करणा-या सर्व विभागांच्या अधिका-यांमार्फत प्रत्येक गावामध्ये विविध सेवा ठराविक कालावधीत पोहचविण्यासाठी "एक दिवस गावक-यांसोबत ग्रामदरबार " हा नाविन्यपुर्ण उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येत आहे.आष्टी तालुक्यातील पारगांव जो.येथे पहिला ग्रामदरबार उपक्रम दि.२८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.पारगांवचे सरपंच पोपट दगडु शिराळे अध्यक्षतेखाली हा ग्रामदरबार घेण्यात आला.यांच्या पोपट यावेळी बीड जि.प.चे जिल्हा शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, विस्तार अधिकारी पंचायत बाळासाहेब जायभाये,विस्तार अधिकारी एन.डी.शिंदे,विस्तार अधिकारी कृषी नितीन राऊत, सरपंच पोपट शिराळे,माजी सरपंच सुर्यकांत मोकाशे,गणेश मोकाशे,कल्याण सावंतफुले,सागर भोसले,अरविंद भोसले,ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी औंदकर,गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,अधिक्षक बाळासाहेब निंबाळकर,तालुका आरोग्य अधिकारी तांदळे,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर आदि मान्यवर उपस्थित होते.शासनाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते.या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी रोजी झाला.आष्टी तालुक्यातील पारगांव जो.येथे पहिला उपक्रम झाला. विभागातील प्रत्येक तालुक्यातील किमान एका गावात "एक दिवस गावक-यांसोबत (ग्राम दरबार उपक्रम)" हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमासाठी दि. २८ फेब्रुवारी रोजी खासदार,आमदार तसेच स्वातंत्र्य सैनिक व इतर प्रतिष्ठित नागरीकांना आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी ज्योती बेल्हेकर यांच्या हस्ते बेबीकीट वाटप करण्यात आले.तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने ग्रामस्थांचे आरोग्य तपासले व आरोग्याबाबत मार्गदर्शन काले.कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती संबधीत आधिका-यांनी दिली.घरकुल विभागातील कर्मचाऱ्यांनी वेळेत घरकुल पुर्ण करावेत असे आवाहन केले. जलजीवन मिशन योजनेवर ग्रामस्थांनी विविध प्रश्न उपस्थित करुन हे काम दर्जेदार व्हावे अशी मागणी केली. पारगांव जो.येथील शैक्षणिक गुणवत्तेबाबत यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणा-या एका गावास प्रत्येक आठवड्यातील बुधवारी पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी ग्रामपातळीचे अधिकारी हे संयुक्तपणे गावात जाऊन ग्रामस्थांसमवेत या उपक्रमाची अंमलबजावणी करणार आहेत. ग्रामपंचायत विभाग-- ग्रामपंचायतच्या अखत्यारीत असणा-या विविध अभिलेख्यांवर आधारीत सेवा कायद्यांतर्गत विविध उता-यांचे निर्गमन करणे,ग्रामपंचायती च्या वरिष्ठ अधिका-यांकडून ग्रामपंचायतीचे अभिलेख्यांचे सखोल तपासणी करणे,ग्रामपंचायत च्या विविध कर वसुली त्यादिवशी १०० टक्के पुर्ण करणे,ग्रामसभेचे आयोजन करणे,वैयक्तीक विविध लाभांच्या योजनांचे अर्ज परिपुर्ण तयार करणे,ग्रामपंचायच्या विविध प्रलंबित ८-अ अंतर्गत नोंदी मंजुर करुन घेणे व नागरीकांना ८-अ चे उतारे देणे,ग्रामपंचायतकडे प्रलंबीत तक्रारींचा निपटारा करणे,गावांतर्गत रस्ते,नाली बांधकाम,दोन गावांना जोडणारे रस्ते व इतर बांधकामांना भेटी देणे क्रमप्राप्त ठरते. कृषी विभाग- शेतक-यांसाठी पिक नियोजन,किड नियंत्रण,खत नियोजन,योग्य बियाणांचा वापर, रसायणमुक्त शेती, झिरो बजेट फार्मिंग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण शिविर आयोजीत करणे, शेतक-यांना कमी पाण्याचा वापर बाबतचे विविध तंत्रज्ञानाची माहिती देणे,शेतक-यांच्या शेतातील माती परिक्षणासाठी माती नमुने गोळा करणे, बायोगॅस, सौर चुली व विविध पारंपारिक उर्जा तंत्रज्ञानाची माहिती देणे, शिक्षण विभाग - ग्रामस्थ,ग्रामशिक्षण समिती व तालुक्यांचे शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे गुणवता तपासणीसाठी उपक्रम राबविणे, शाळेची संपूर्ण सफाई,स्वच्छता,पाण्याच्या टाकीची सफाई,किचन सफाई,स्वच्छता गृहांची सफाई, परिसर स्वच्छता इ. उपक्रम राबविणे, शिक्षण विभागातील अधिका-यांमार्फत शाळेची सखोल तपासणी ग्राम शिक्षण समितीच्या उपस्थितीमध्ये करणे,शाळेमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करणे,गावामध्ये प्रभातफेरीचे आयोजन करणे,नवीन शाळाखोली बांधकाम पाहणी करणे, महिला व बाल कल्याण व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग - गावातील महिलांची स्वयंसहायता गटांची स्थापना करणे,बंद पडलेल्या गटांना मार्गदर्शन करुन पुर्नजिवित करणे, स्वयंसहायता गटांना अभिलेख लिहिणे,बैठकीचे कामकाज चालविणे,बँकेचे कामकाज करणे याबाबत प्रशिक्षण आयोजीत करणे,स्वयंसहायता गटांना कौशल्य वृध्दीसाठी प्रशिक्षण देणे,विविध व्यवसाय उभारणी कामी आवश्यक ती सर्व विषयांचे प्रशिक्षण देणे, महिलांना संवाद कौशल्य व अन्य Soft Skill चे प्रशिक्षण देणे, गावातील किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समुपदेशनचे व्याख्यान आयोजीत करणे,महिलांना सॅनिटरी नॅपकीन वापराबाबत माहिती देणे,अंगणवाडी इमारत बांधकाम पाहणी करणे, अंगणवाडी केंद्राना भेटी देणे, कुपोषीत बालके,गरोदर महिला व स्तनदा माता यांना आहार व आरोग्य सेवा देणेबाबत पाठपुरावा करणे, आरोग्य विभाग -गावातील नागरीकांची आरोग्य तपासणी करणे, वयोवृध्द लोकांसाठी स्वतंत्र तपासणी करणे,गरोदर मातांची तपासणी करणे,विविध रक्त तपासण्या करणे, सिकल सेल अंतर्गत तपासणी करणे,माता व बालकांचे लसीकरण करणे, रक्तदान,नेत्रदान,अवयवदान इ.शिबिरांचे आयोजन करणे,नेत्र तपासणी,मौखिक आरोग्य तपासणीचे आयोजन करणे, ग्रामस्थांना विविध आजारांमध्ये घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन करणे,प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकामांना भेटी देणे, पशुसंवर्धन विभाग - गावातील पशुधनाची आरोग्य शिबिरे आयोजीत करणे,विविध प्रकारचे लसीकरण करणे,देशी वाण संवर्धन व वृध्दीसाठी प्रशिक्षण देणे, शेतक-यांना गोठा नियोजन,मलमुत्र नियोजन, जनावरांची निगा,आहार,दुग्ध वाढीसाठी आवश्यक बाबी यांचे प्रशिक्षण देणे,शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन अर्ज तयार करणे,पशुसंवर्धन केंद्र व उपकेंद्र बांधकामांना भेटी देणे, समाज कल्याण -गावातील मागासवर्गीय वस्तीमध्येस्वच्छता अभियान राबविणे, विविध शासकीय योजनांबाबत तसेच कायदेविषयक बाबी बाबत वस्तीतील नागरीकांना मार्गदर्शन करणे, विविध योजनांचे लाभार्थी निवड करुन त्यांचे अर्ज तयार करणे, अनुसूचित जाती जमाती वस्ती अंतर्गत विकास कामांना भेटी देणे, पाणी पुरवठा-गावातील विविध हैंड पंप,विद्युत पंप यांची आवश्यक तेनुसार दुरुस्ती करणे व सर्विसिंग करणे,गावातील विविध पाण्याच्या उदभवाच्या कार्यक्षेतामध्ये ग्रामस्थांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविणे,गावातील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन मधील लिकेज काढणे,पिण्याच्या पाण्याच्या विविध उदभवातील पाण्याचे नमुने काढणे,पाणी शुध्दीकरणाबाबत कर्मचा-यांचे प्रशिक्षण आयोजीत करणे,गावातील नागरीकांना पाणी बचतीबाबत मार्गदर्शन करणे,गावातील नागरीकांच्या घरामध्ये असणा-या नळांना तोट्या बसविणे,पाण्याची टाकी सफाई करणे,जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या योजनांना भेट देऊन पाहणी करणे,स्वच्छता विभाग -गावामध्ये संपुर्ण स्वच्छतेचा कार्यक्रम राबविणे, सर्व नागरीक शौचालयाचा वापर करत असल्याची खात्री करणे,जे नागरीक शौचालयाचा वापर करत नसतील त्यांना वापर करण्यास भाग पाडणे,गावातील नाल्या सफाई करणे, परस बागाची निर्मिती करणे, गावातील खुरटी झुडपे,गाजर गवत निर्मुलन करणे, गावातील नागरीकांना ओल्या व सुक्या कच-यासाठी कचरा कुंडीचे वाटप करणे, गावातील घनकच-याच्या विलगीकरणाची व कचरा प्रक्रियेची आखणी करून त्याची सुरुवात करणे,गावामध्ये प्लास्टीक निर्मुलन मोहीम राबविणे,
गावातील सांडपाण्यासाठी शोष खड्डे आखणी करुन पुर्ण करुन घेणे व नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नियोजन करणे, गावातील सर्व शासकीय इमारतींना रंगरंगोटी,डागडुजी व स्वच्छता करणे, गावातील उकिरड्यांच्या ठिकाणी नरेगा अंतर्गत नाडेफ उभारणीसाठी नियोजन करणे, सिंचन व जलसंधारण - गावातील शिवार फेरी ग्रामस्थांच्या समवेत करणे,गावातील विविध जलसंधारणच्या उपचारांना भेटी देऊन त्याची देखभालीसाठी ग्रामस्यांच्या समित्या तयार करणे,विविध खराब झालेल्या स्ट्रक्चरची डागडूजी करणे,लोकवर्गणी तून नाला खोलीकरण व सरळीकरण तसेच बांध बंदिस्ती या सारखी कामे करणे,मनरेगा अंतर्गत जलसंधारणाच्या विविध उपचाराची जागा निवडून त्याचा आराखडा मंजुरीसाठी तयार करणे,मनरेगा अंतर्गत विविध प्रस्ताव बनविणे आदि कामे केली जाणार आहेत.यावेळी सर्व विभागातील सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सुत्रसंचलन अक्षय भोसले यांनी तर उपस्थितीतांचे आभार ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी औंदकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या