आष्टी (प्रतिनिधी)
आईवडीलांच्या रुणातुन कधीच कोणीलाच मुक्त होत येत नसते. प्रत्येक धर्म ग्रंथ,पुराण,शास्त्रात आईवडीलांचे महत्व,त्यांचे उपकारच सांगितले आहेत.श्रध्देने केलेले कार्य म्हणजे वर्षश्राध्द होय.श्रध्देनेच केलेले कार्य हे सिध्दाला जात असते.कवी,गायक,लेखक यांनी आईचे वर्णन केलेले आहे.मात्र जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी ख-या अर्थाने बापाचे वर्णन आपल्या अभंगातुन केलेले आहे.संगोपन (सांभाळणे),संवर्धन (वाढविणे) आणि संक्रमण (संस्कार पुढे देणे) असे काम माणुस करीत असतो.एकवेळ देवाचा दोष परवडला.वाईट करीत नसतो पण पितृदोष पितृदोष फार वाईट असतो.मरण कुणालाच चुकविता येत नसते.मरणाचे स्मरण व देवाचे स्मरण असले की जीवन सुखकर आनंदी होते.दत्तात्रय वारे हे शैक्षणिक, सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत होते.त्यांनी अनेक दिंड्याना अन्नदान केलेले आहे.दत्तात्रय वारे एक धाडशी व्यक्तीमत्व होते.शिक्षण विभागात नौकरी करताना शैक्षणिक विभागात चांगले काम केले.आपल्या वाट्याला आलेले आनंदाने काम करावे.दत्तात्रय वारे यांनी वाट्याला आलेले काम आनंदाने केले.
आई वडीलांच्या उपकारातुन कधीच कोणी उतराई होऊ शकत नाही असे प्रतिपादन ह.भ.प.गोवींद महाराज
नाईकवाडे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील प्रताप वारे यांचे भाऊ तर इंजि.प्रवीण वारे यांचे वडील कै.दत्तात्रय कांतीलाल वारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दि.४ मार्च रोजी आष्टी येथील माऊली मंदिरजवळ निवासस्थानी आयोजित कीर्तनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी ह.भ.प.अशोक काकडे, अमोल महाराज भोसले -बळे,कृष्णा महाराज,रोहित महाराज,समाधान महाराज,ह.भ.प.सौ.दानवे महाराज, सुनिता पोकळे,युवा नेते जयदत्त धस,युवानेते अजयदादा धोंडे, सभापती बद्रीनाथ जगताप,चेअरमन आदिनाथ सानप,उत्तमराव पोकळे,चौकडे गुरव पिंपरी,यशवंत खंडागळे,कड्याचे माजी सरपंच रामशेठ मधुरकर,भगवान शिनगिरे,बबन पोकळे,सेवानिवृत उपअभियंता पी.ई.तळेकर आप्पा,

सरपंच पोपट गोंडे,माजी सरपंच बन्सीभाऊ पोकळे,बाळासाहेब थोरवे, माजी सरपंच बबन करांडे,जेष्ठ पत्रकार सीताराम पोकळे, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार प्रवीण पोकळे,सरपंच भीमराव बोडखे,माजी सरपंच कल्याण पोकळे,अध्यक्ष सुखदेव पोकळे,संजयदादा विधाते,भाऊसाहेब गाडे काका,सरपंच तात्या शिंदे,उपसरपंच सतीश पोकळे,मारुतीमामा पोकळे,माजी सरपंच संजय पोकळे,कैलास पोकळे,डाॕ.अभिजीत सायंबर, प्रा.अमृत पोकळे,सरपंच चंदनशिव,पोपट आबदार,दादा जगताप,प्रा.राजु पाचे,जयशिंग गव्हाणे,कल्याण पत्रकार किरण पोकळे,ॲड.हनुमंत शिंदे,दत्ता हुले,ग्रामसेवक नवनाथ लोंढे, ग्रामसेवक जगताप,सरपंच हिराभाऊ केरुळकर, राधाकिशन पोकळे,शहाजी पोकळे,सदाशिव पोकळे,मधुकर पोकळे आदि राजकीय, सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ह.भ.प.गोवींद महाराज नाईकवाडे म्हणाले की, देव,देश व धर्मासाठी दत्तात्रय वारे जगले.माणसाने आपले मरण व मरेपर्यत ज्या देवाने जगविले त्याचे नामस्मरण या दोन गोष्टी कधीच विसरु नये. नरदेहात आपल्याला काय व्हायचे हे आपणच ठरु शकतो.. नराचा नारायण व नराचा राक्षस होता येते.दृष्टीतील दोष सुधारा. आनंद मिळेल.दृष्टी बदला दष्टीकोन बदलेल.दृष्टी तशी सृष्टी असते.आपण कीती जगलो यापेक्षा आपण कसे जगलो याला महत्व आहे.जीवन परोपकारी असेल तर देव धर्म करण्याची गरज नाही.पुण्य तो परोपकार,पाप ते परपिडा असते.देवाला भेटल्यावर संसारातील सर्व दुःख नाहिसे होतात.माणसांचे वेष्टी व समयष्टी कर्तव्य असतात.
संकल्प सोडल्याशिवाय कधीच कोणतं दान सिध्द होत नसतं.
तुमची नजर सुधारा तुमची नजर चांगली असेल तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडताल आणि तुमची वाणी चांगली असेल तर जग तुमच्या प्रेमात पडले.तुमची वाईट सवय सोडा हाच तुमचा परमार्थ असून तुमच्या अंतःकरणातील विकार बाहेर पडले.तुमचा शेवट गोड होईल.
यावेळी उपस्थितीतांचे इंजि.प्रवीण वारे व प्रताप वारे यांनी आभार मानले.
-------------------
0 टिप्पण्या