Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाणीच्या निषेधार्थ कडा शहर बंदला उस्फूर्त प्रतिसाद

आष्टी (प्रतिनिधी) मस्साजोग येथील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या व सोशल मिडीयावर त्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी कडा शहर बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोषभैय्या देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करुन तसेच मानहानी करुन अतिशय क्रूरपणे हत्या केली गेली.त्याचे फोटो समाज माध्यमावर ३ मार्च रोजी प्रसारित करण्यात आले. त्यामुळे सर्व समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून या अपराधी नराधमांना लवकरात लवकर फाशी व्हावी व दिवंगत आत्म्यास शांती मिळावी याकरिता बुधवारी कडा शहर बंद ठेवण्यात आले.यामधे व्यापारी संघटनांनी सहभाग घेतला होता.कडा शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.यावेळी मागण्यांचे निवेदन पो.कॉ.सय्यद मझहर यांना देण्यात आले.यावेळी माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे,उपसरपंच दीपक कर्डीले,संदीप खाकाळ,बाळासाहेब कर्डीले,संजय ढोबळे,दत्ता होळकर,दीपक सोनवणे,अनिल शिंदे,विष्णू कराळे,रोहिदास कर्डीले आदी नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या