

आष्टी (प्रतिनिधी)
अत्यंत खडतर आणि परिश्रमपूर्वक विद्यार्थीदशेपासून केलेला प्रवास अखेर फलदायी ठरला आहे.आपल्या अनेक वर्ष आणि ७० च्या.पासुन दशकाच्या आरोग्य क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेतला असता आरोग्य क्षेत्राविषयी जनमानसात विश्वास निर्माण करण्याचे मौलिक कार्य आणि
डॉ.सोमनाथ टेकाडे यांचे आरोग्य क्षेत्रात हिमालयाच्या उंचीचे कार्य असल्याचे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांचे बंधु प्रा.डाॕ.बाळासाहेब धोंडे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील कडा येथे सेवानिवृत वैद्यकीय अधिकारी डाॕ.सोमनाथ टेकाडे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी सौ.अंजली सोमनाथ टेकाडे व मुलगी डाॕ.अर्चना गणेश झगडे,सुना डाॕ.सौ.डॉ.मंजुश्री सचिन टेकाडे,सौ.डॉ.प्रिया संदीप टेकाडे यांनी औक्षण केले.या कार्यक्रमात प्रस्ताविक डाॕ.सचिन टेकाडे यांनी केले.
यावेळी प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,डाॕ.मधुकर हंबर्डे ,डाॕ.उमेश गांधी,डाॕ.पंडीत खिलारे,दिलीपराव काळे,युवराज पाटील,सुनिल टेकाडे सर यांनी डाॕ.टेकाडे यांच्याबाबत गौरवोद्गार काढले.
आष्टीचे भूमिपुत्र आणि कडा येथील आरोग्य केंद्राचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.सोमनाथ टेकाडे यांना ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सवी सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी अनेकांनी आपल्या भावना डॉ.सोमनाथ टेकाडे यांच्या कार्यासंदर्भात अत्यंत उदार आणि ओघवत्या शब्दात व्यक्त करताना स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.यावेळी विठ्ठलराव बन्सोडे, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,कडा शहराचे प्रथम नागरीक युवराजदादा पाटील,बिपीनशेठ भंडारी,बाळूशेठ कटारीया, डाॕ.पंडीत खिलारे,रमेश मुळे,प्रा.गोरख मुळे,प्रा.डाॕ.राम बोडखे,डॉ.आण्णा गाडे,पत्रकार राजेश राऊत,राजेंद्र तांगडे, डॉ.उमेश गांधी,डॉ.आण्णा हजारे,प्रा.आर.जी.विधाते,प्राचार्य सुरेश बोडखे,डॉ.स्मिता हजारे,राम मुळे,अतुल मुळे,प्रा. श्रीकांत धोंडे,सौ.नंदा विधाते,मोहटादेवीनगर मधील सर्व नागरीक,डॉ.सोमनाथ टेकाडे,डॉ.सचिन टेकाडे आणि डॉ. संदिप टेकाडे यांचे हितचिंतक असे अनेक हितचिंतक,राजकीय,सामाजिक,धार्मिक
क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.आष्टीचे सुपुत्र वामाजी वैद्यकीय अधिकारी डॉ.सोमनाथ विश्वनाथ टेकाडे यांचा अमृत महोत्सवी ७५ वा.वाढदिवस सोहळा मंगळवार दि.४ मार्च २०२५ रोजी दुपारी १ वा.करण्यात आला आहे.डाॕ.टेकाडे यांच्या प्रदीर्घ प्रेरणादायी जीवनाच्या या अनमोल आणि पवित्र मंगलमय
क्षणी,त्यांच्या कष्टाची,त्यागाची व प्रेमाची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.यावेळी
सौ.अंजली सोमनाथ टेकाडे,
सौ.डॉ.अर्चना गणेश झगडे,सौ.डॉ.मंजुश्री सचिन टेकाडे,
सौ.डॉ.प्रिया संदीप टेकाडे,आर्वी सचिन टेकाडे,साईयांश संदीप टेकाडे,
डॉ.गणेश भाऊराव झगडे,डॉ.सचिन सोमनाथ टेकाडे
डॉ.संदीप सोमनाथ टेकाडे,आर्णव गणेश झगडे,आरुष सचिन टेकाडे,साईश्री संदीप टेकाडे उपस्थीत होते.
0 टिप्पण्या