Ticker

6/recent/ticker-posts

उत्तम बोडखे हे माझे जीवस्य कंठस्य आणि सद्गुणी मित्र असल्याचा अभिमान!

........मित्र म्हणजे निसर्गाने बहाल केलेला भाऊ असतो! या अनुषंगाने खऱ्या अर्थाने सातत्याने सुखदुःखात समरस होऊन नवी ऊर्जा शक्ती ताकद आणि मनाला सातत्याने संवेदना जागृत ठेवणारा एक धैर्यशील मित्र म्हणून मला उत्तम बोडखे भावासारखे प्रिय वाटतात! ऐश्वर्याला सर्व दरवाजे खुले असतात चांगल्या अंतकरणास सोन्याचे मूल्य असते तसेच जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते याची पूर्ण जाणीव आणि ही वैशिष्ट्ये ज्यांच्याकडे आहेत असे माझे भाऊसमान मित्र म्हणजे उत्तम बोडखे आहेत.मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन आहे आपल्या ५६ वर्षाच्या जीवन संघर्ष सातत्याने इतर शांती करताना स्वतः कर्तव्यदक्ष राहून विनयशीलता,नम्रपणा आणि कर्तव्यदक्षता या मूल्यांना सातत्याने स्मरण ठेवून प्रवास करणारा एक अत्यंत जिद्दी प्रवासी म्हणून माझा मित्र असल्याचा मला नेहमी सार्थ अभिमान वाटतो. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटल्या जाणाऱ्या माध्यम क्षेत्रातील वृत्तपत्राच्यासाठी लिहिणारा एक बीड जिल्ह्यातील होतकरू आणि समता,बंधुत्व, ऐक्य,सर्व धर्म समूह ही मूल्य जपणारा पाळणारा आणि प्रत्यक्षात निभावणारा माझा मित्र जिल्ह्यातील नामवंत पत्रकारांच्या मालिकेत असल्याचा गौरव आहेच... आष्टी तालुक्याच्या वाड्यावर त्या आणि शहरांमधून अनेकांच्या सुखदुःखात समरस होताना त्यांच्या मोठेपणाची नम्रतेची साक्ष येते. ज्याच्याजवळ द्रव्य नाही ती व्यक्ती बाण नसलेल्या धनुष्यासारखी असते असे म्हणतात परंतु ज्या माणसाजवळ संयम आहे.तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो उत्तम बोडखे यांच्या रूपाने धनापेक्षा शब्दांना सुवर्णमूर्ती समजून हजारो लाखो माणसे जपण्याचे कसब त्यांना लाभले आहे. मोठमोठे दिग्गज राजकारणी नेते कार्यकर्ते यांच्याशी उत्तमरावांचे अत्यंत स्नेहाचे संबंध आहेत.अनेक संत, महंत कीर्तनकार प्रवचनकार हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.विविध धार्मिक कार्यक्रमात समरसतेने सर्वांच्या पुढे जाऊन बसणारे उत्तम बोडखे असतात,त्यांच्या शिवाय तालुक्यातला कुठलाच धार्मिक कार्यक्रम शोभा देत नसेल असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये! सर्वांना ज्ञानाची इच्छा असते पण मोबदला देण्याची तयारी नसते.मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येते जुना मित्र हा नव्या वास्तुसारखा असतो.खूप हुशारीपेक्षा चिमूटभर प्रामाणिकपणा सद्गुणी श्रेष्ठ असतो याप्रमाणे माझे पत्रकारिता क्षेत्रातील सच्चे मित्र उत्तमराव बोडखे हे माझे लहान भाऊ आहेत.आज अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने त्यांच्या दिर्घायुष्यासह आनंदी आणि प्रगतशील वाटचालीला मनापासून ईश्वराकडे प्रार्थना आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..! --विक्रम पोकळे (माजी शिक्षणाधिकारी, जि.प.बीड) ----------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या