Ticker

6/recent/ticker-posts

आईची ममता अन् पित्याचे प्रेम देणाऱ्या अध्यापिका ;श्रीमती आशाताई फड-चाटे

चौकट -------- महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला.१९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार व जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले.आज ८ मार्च अर्थात जागतिक महिला दिन.यानिमित्ताने कार्य कुशल स्त्रियांच्या कर्तुत्वाचा अल्पसा आढावा या निमित्ताने घेतला आहे. --------------------- शिक्षण ही एक पवित्र संस्था आहे.तेथे माणसांची मने सुसंस्कृत होतात. उदात्त होतात.राष्ट्रीयता आणि मानवता निर्मितीचे एक ठिकाण आहे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.यासाठी सामान्य माणसाला शिक्षण सुलभ होईल यासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे. सद्गुरु गाडगे महाराज,महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या मनुष्याचा उद्धार करणाऱ्या महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्या वाटेवर चालण्यातचा किमान प्रयत्न आवश्यक आहे.त्या दृष्टीने आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात केलेले दैदिप्यमान पाऊल या निमित्ताने त्यांचे कौतुक आहे! श्रीमती आशा फड! एक अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून प्रतिकूल वातावरणातून तसेच ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पुढे आलेल्या सुस्वाभावी शांत संयमी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देत समाज भान ठेवणाऱ्या साहित्यिक!शालेय महाविद्यालयीन स्तरावर भाषण लेखन गायन एकांकिका नाटक यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग. इयत्ता दहावी ते पीएचडी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण. विविध वर्तमानपत्रातून अनेक विविध विषयावर विस्तृत लेखन त्यांनी केले.स्त्रियांच्या समस्यावरही त्यांचे लेखन आहे.वयाच्या अकराव्या वर्षापासून कविता व इतर लेखन मनोरंजना तून शैक्षणिक सामाजिक धार्मिक वैचारिक सांस्कृतिक कार्य सुरू आहे.राष्ट्रपुरुष,संत यांच्या जयंती पुण्यतिथी अनुषंगाने त्यांचे लेखन आहे.प्रौढ साक्षरता अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती पथनाट्य समाज विकास वृक्षारोपण, भ्रष्टाचार निर्मूलन यासंदर्भात वैचारिक उद्बोधन त्यांनी केलेले आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या गरीब मुलींशी संपर्क करून त्यांना मार्गदर्शन आणि मदत केल्याचे अनेक उदाहरणे आहेत.व्याख्यानमाला,शिवचरित्र,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहू महाराज,महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आदी सह राष्ट्र स्त्रीपुरुषांच्या विचार कार्यांवरील उपक्रमात सहभाग नोंदवला.मनोगत पत्र मैत्री मिळावे महोत्सव फेस्टिवल यात हक्क व कर्तव्य याची जाणीव करून देत अनेक कार्यात मदत आणि सहभाग हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.महाराष्ट्र राज्य नेट,सेट पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या बीड जिल्हा समन्वयक म्हणून त्यांचै कार्य महत्त्वाचे राहिले.अत्यंत धार्मिक वृत्ती असलेल्या आशाताई फड यांनी ईश्वरावर श्रद्धा ठेवून समता शांतता बंधुत्व ऐक्य सर्वधर्मसमभाव ही मुल्ये समाजात रुजवण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न केला आहे. मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या शैक्षणिक संशोधन व साहित्य क्षेत्राबद्दलच्या योगदाना विषयी त्यांचा विशेष पुरस्काराने सन्मान झाला आहे. उत्कृष्ट कादंबरी लेखनाबद्दल राजस्थान साहित्य सेवा मंडळाचा २०२३ चा संगम साहित्य सेवा सन्मान त्यांच्या नावावर आहे. साहित्य व शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल बीड जिल्हाधिकारी दीपा मधोळ-मुंडे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान झालेला आहे. नॉलेज प्लांटच्यावतीने 'सावित्रीची लेक'पुरस्काराने ही त्यांचा गौरव झालेला आहे.निस्वार्थपणे स्त्री समस्यांच्या अनुषंगाने लेखन आणि तण-मन-धनाने मात्रप्रेम,धर्म प्रेम,देश प्रेम,ऐक्य,बंधुत्व समता,सर्वधर्मसमभाव या मूल्यांना समाजात रुजवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न स्तुत्य आहे. आज महिला दिनाच्यानिमित्ताने प्रा.आशा फड यांना खूप खूप शुभेच्छा..! लेखिका-- सौ.बबीताताई बोडखे (शिक्षिका,आष्टी) ---------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या