आष्टी (प्रतिनिधी)
दैनंदिन जीवनाशी सांगड घालणारे मराठी भाषा विषयाचे शिक्षण महत्त्वाचे आहे. साहित्यातून उद्याचे वाचक लेखक कवी व्यवसायिक घडावेत अशी अपेक्षा व्यक्त करून मातृभाषेच्या शिक्षणातून राष्ट्रभक्तीची जाज्वल्य भावना अखंडित प्रज्वलित होते असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.सितम सोनवणे यांनी व्यक्त केले.
एका शिक्षण विषयक कार्यक्रमांच्या दरम्यान सूत्रसंचालन आणि निवेदक प्रा.बिभिषण चाटे यांची महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या बीड जिल्हा सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांना अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर नीलकंठ भोसले,श्रीयुत निकम आदींसह उपस्थित होते.प्रा.बिभिषण चाटे यांचे अभिनंदन आणि कौतुक करत डॉ. सितम सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या.दरम्यान,डॉ. सोनवणे पुढे म्हणाले,भाषिक कौशल्ये यांच्या विकासाला शास्त्रशुद्ध पाया मिळाला पाहिजे.मराठी साहित्यातून जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना निर्माण होते.मराठीच्या साहित्याने वैभवात फार मोठी भर घातलेली आहे.मातृभाषेच्या लेखनामागे राष्ट्र समर्पणाचा आणि राष्ट्र हिताचा भाव असतो.आत्म्याची भाषा म्हणून मराठीचा गौरव शासन समाज आणि सर्व स्तरावर झाला पाहिजे.यावेळी उच्च माध्यमिक स्तरावर मराठी भाषा विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असावी यासाठी त्यांनी समर्थन दिले.
चौकट
--------

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा.सुनील डिसले यांच्या आदेशावरून प्रा.बिभीषण चाटे यांची बीड जिल्हा सचिवपदी,जिल्हा प्रतिनिधीपदी प्रा.डॉ.आत्माराम झिंजुर्डे आणि कार्याध्यक्षपदी प्रा.डॉ.अशोक देवगुडे यांचे नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.सितम सोनवणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या