
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील श्री गणेश विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रद्युम्न मोहन डाळिंबकर यांची एमपीएससी परीक्षेतून पीएसआयपदी नियुक्ती झाली.त्यानिमित्त शाळेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक तथा संचालक रमेशसिंह देसुरकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश सावंत,चेअरमन आदिनाथ सानप,मोहनराव डाळिंबकर यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी सरपंच रोहिदास पवार, साहेबराव वायकर,सर्जेराव वायकर,दादा रेडेकर,नितीन साप्ते,बबन वायकर,बजरंग वायकर,मल्हारी मोरे, बाळासाहेब गवारे,सचिन हराळ,संदीप पानसांडे,नवनाथ नवसुपे,खंडू वायकर संस्थेचे संचालक पोपटराव घुले,माजी मुख्याध्यापक दादासाहेब खाडे,त्रिंबकराव इजारे आदी उपस्थित होते.चेअरमन आदिनाथ सानप यांनी सत्कारमूर्तीचे व त्यांच्या आई-वडिलांचे कौतुक करून शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खेड्यातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता अहोरात्र अभ्यास करून यश संपादन करावे.प्रद्युम्न डाळिंबकर यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत वडिलांचे मार्गदर्शन व शाळेतील गुरुजनांचे मार्गदर्शन घेत समाजाचे व प्रशालेचे नाव पंचक्रोशीत मोठे केले असे मत पर्यवेक्षक अशोक गाडेकर यांनी मांडले.जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश यांनी मिळवले असे मत त्रिंबकराव ईजारे यांनी मांडले तर प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांचे नाव या विद्यार्थ्याने मोठे केले असे आपले मत मांडले तर सत्कारमूर्ती प्रद्युम्न डाळींबकर यांनी या शाळेचे माझ्या यशात सर्वात जास्त योगदान आहे.अभ्यासात सातत्य असेल यश मिळते.परिस्थितीची चिंता नव्हे तर मनाची जिद्द ठेवा. आत्मविश्वास असेल तर यश मिळतेच.प्रशालेतील गुरुजनांचे आभार मानले.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद तरटे सर, करडकर सर,दातार सर अष्टेकर सर,भोसले सर,सुंबरे सर, वराट सर,केरुळकर सर,श्रीमती चौधरी मॅडम,श्रीमती वाघमारे मॅडम,श्रीमती हजारे मॅडम,श्रीमती म्हस्के मॅडम,संजय कुमार थेटे या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मोहनराव ठोंबरे व सूत्रसंचालन संदीप गावडे सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार नवनाथ मोरे सर यांनी मानले.
0 टिप्पण्या