Ticker

6/recent/ticker-posts

भवरवाडी येथे शिवपुराण कथा व रौप्यमहोत्सवी अखंड हरिनाम सोहळा सुरु

आष्टी (प्रतिनिधी) जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथील ज्ञानेश्वर सेवा संस्थान येथे दि.८ ते १२ मार्च या कालावाधीत शिवपुराण कथा व रौप्यमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सुरु झाला आहे.शनिवार दि.८ मार्च २०२५ पासुन तुळशी पुजा, शिवपुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला आहे.या सप्ताहात भागवताचार्या ह.भ.प.कांतामाई सोनटक्के महाराज यांची शिवपुराण कथा होणार आहे.या कथेस संगीत साथ ह.भ.प.महावीर घुले,ह.भ.प.ज्ञानेश्वरी दिदी,ह. भ.प.वैष्णवी दिदि,ह.भ.प.राधा दिदि महाराज यांची लाभणार आहे. शिवपुराण कथा, विष्णु सहस्त्रनाम, महादेव मंदिर देवस्थान व ज्ञानेश्वर सेवा संस्थान भवरवाडी येथे होणार आहे.या सप्ताहात भागवताचार्य ह.भ.प.कांताताई सोनटक्के महाराज यांची दररोज सकाळी १० ते १२ यावेळात सुश्राव्य शिवपुराण कथा होता आहे.सप्ताहात आदिनाथ गळगटे,वैष्णवी सोनटक्के,सौ.बबिताताई बोडखे,ज्ञानेश्वरी सोनटक्के, राधा सोनटक्के,भारत जाधव, रामदासी महाराज,भागवत बामदळे यांचे प्रवचन होणार आहे.या सप्ताहात ह.भ.प. बालकीर्तनकार कु.राधादिदि महाराज (भवरवाडी), ह.भ.प.सुधाकर महाराज वाघ (पैठण),ह.भ.प.पंकज महाराज थोरे (परभणीकर), भागवताचार्या ह.भ.प. कांतामाई महाराज सोनटक्के यांचे हरिकीर्तन होणार आहे. बुधवार दि.१२ मार्च रोजी सकाळी १० ते १२ यावेळात विनोदाचार्य ह.भ.प.प्रकश महाराज साठे (बीड) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.महाप्रसाद महापंगत दत्तात्रय बामदळे, परमेश्वर सोनटक्के,दत्तात्रय रासकर,भरत भिसे यांच्यावतीने देण्यात येणार आहे अशी माहिती ज्ञानेश्वर सेवा संस्थानचे सचिव ह.भ.प.शिवाजी महाराज बिडवे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या