
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालयाचे माजी जनरल सेक्रेटरी (जी.एस.)किरण भगवान शिनगीरे यांचा वॅक बुक ऑफ रेकॉर्ड (Wac)कडून इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने वॅक बुक ऑफ रेकॉर्डच्या अध्यक्षा डॉ.ज्योती दियावर व विजय बजाज यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला.किरण शिनगीरे यांनी सन २०१९ -२०२० यावर्षी युवकांचे संघटन करून वटणवाडी तालुका आष्टी येथे गांधी महाविद्यालयाचा गावात सात दिवस कॅम्प घेऊन वृक्षारोपण केले.स्वच्छता मोहीम राबवली.गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ श्रमदानातून बंधारा तयार केला.पाण्याचे जल व्यवस्थापन कसे करावे ? याबाबत तज्ञांकडून गावात युवक व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, तसेच जलसंवर्धनासाठी युवकांचे योगदान,ग्रामसमृद्धी मध्ये महिलांचे योगदान,विज्ञान विकास,अध्यात्म व विकास,कवी संमेलन याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले.राष्ट्रीय एकात्मता,पर्यावरण जागृती,ग्रामस्वच्छता,मतदानाच्या हक्काविषयी जनजागृती केली, बेटी बचाओ बेटी पढाओ,जलसाक्षरता,अंधश्रद्धानिर्मूलन आदि मंदिर व शाळा परिसरात वृक्षारोपण व संवर्धन केले.यापुढील कोरोनाच्या काळात कोरोना विषयी जनजागृती केली. त्याचबरोबर मास्क,सॅनिटायझर,मोफत धान्य वाटप,आर्सेनिक गोळ्यांचे वाटप,संतूर व डेटॉल साबणचे व हँडवॉश वाटप आदि वस्तूंचे वाटप केले,बचत गटाविषयी जनजागृती,लसीकरण मोहीमेत सक्रिय सहभाग,आभा कार्ड विषयी जनजागृती इत्यादी कार्य केले.त्यापुढील काळात पुन्हा गांधी महाविद्यालयाचा वटनवाडी या गावात सात दिवस कॅम्प घेऊन त्यामध्ये विविध कार्य केले.पुढील काळात देवी-निमगाव येथे कॅम्पमध्ये प्लास्टिक मुक्ती मोहीम,ग्रामस्वच्छता,मतदानाविषयी जनजागृती, हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी केली. वटणवाडी येथे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा कॅम घेऊन ५१ महिलांचे मोफत फॉर्म भरून दिले.साक्षरता विषय जनजागृती, रेशन विषयक जनजागृती,सामाजिक ऎक्य वाढवणे आदि कार्य केले.या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना वॅक बुक ऑफ रेकॉर्ड कडून विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहिर करण्यात आले होते. त्यामध्ये वर्ष २०२५ किरण शिनगीरे यांना इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांना यापूर्वीही राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्काराने जि.अकोला, राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाज रत्न पुरस्कार नाशिक,राज्यस्तरीय यशवंत रत्न पुरस्कार बीड,राष्ट्रीय नॅशनल आयकॉन पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आलेले आहे.या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे आ.सुरेश धस,सौ.प्राजक्ताताई धस,जयदत्त धस,सागर धस, भगवान शिनगीरे,बीड जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के, संस्थाचालक वैजिनाथ निर्मळ,योगेश भंडारी,कांतिलाल चानोदिया, हेमंत पोखरना,डॉ.उमेश गांधी,डॉ. महेंद्र पटवा,माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, कडा कृ.उ.बा.समितीचे संचालक रामशेठ मधुरकर, सरपंच सतीशशेठ धस,पत्रकार रामदास जाधव,प्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी,माजी प्राचार्य डॉ.नंदकुमार राठी,प्राचार्य डाॕ.यु.व्हि.बनाळे,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.राजकुमार थोरवे,प्रा.डॉ.नवनाथ विधाते,प्रा.डॉ.नरेंद्र गवळी,प्रा.डॉ.सोमनाथ हासे,प्रा.डॉ.शिवाजी जगदाळे, प्रा.डॉ.शिवराज पातळे,प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर,डॉ.जमीर सय्यद,जाधव सर,केदार सर,आडकर सर,मिसाळ सर, बोडखे सर,अरुणा कुलकर्णी मॅडम,धनश्री मुनोत मॅडम मॅडम,मीरा नाथ मॅडम,पूजा बोरा,अविनाश कदम,प्रवीण पोकळे,अक्षय विधाते,समीर शेख,स्वाती जाधव,माजी सरपंच छगन शिनगिरे,सरपंच सागर दहातोंडे,उपसरपंच संतोष मुटकुळे,बाळासाहेब खकाळ,विठ्ठल काकडे,राजू मुटकुळे,राम देशमुख,गोकुळ गावडे,असलम शेख,सौरव गुंड,जगदीश वनवे ग्रामस्थांनी व आष्टी तालुक्यातील विविध संघटनेने किरण शिनगीरे यांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या