Ticker

6/recent/ticker-posts

लाखेफळ शाळेत महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या 'एक दिवस बाळांसाठी या उपक्रमांतर्गत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज शनिवारी मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध शालेय अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याला गावातील महिला भगिनी आणि पालक आणि युवक युवतींच्या उपस्थिती व सहभागाने उत्तम प्रतिसाद मिळाला.आज शनिवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जि.प.प्राथमीक शाळा लाखेफळ येथे 'एक दिवस बाळासाठी 'या कार्यक्रमांतर्गत आई व मूल यांचा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमात मुलांचा आनंदी बाजार भरवण्यात आला होता.महिलांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजनही करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन लाखेफळ गावच्या सरपंच सौ.प्रीतीताई गजभिव यांनी केले.अध्यक्षस्थानी उपसरपंच शरद गोरक्षनाथ सोनवणे यांनी स्वीकारले होते.कार्यक्रमाला गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.कार्यक्रमात मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आईकडून बनवून आणले व त्याची विक्री केली.यामध्ये चार ते पाच हजार रुपयांची उलाढाल या छोट्याशा कार्यक्रमात झाली. 'खाऊ गल्ली'चा कार्यक्रम संपल्यानंतर महिलांच्या खेळाचे आयोजन करण्यात आले.या खेळांनाही महिला भगिनींनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.महिलांसाठी फुगडी संगीत खुर्ची,बादलीत चेंडू टाकने यासारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला डॉ.सौ.अश्विनी सोनवणे यांनी देखील हजेरी लावत खेळात उत्स्फूर्त सहभाग घेतला.मुलांनीही कार्यक्रमाचा खूप आस्वाद घेतला.या सर्व कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला दिसून आला.त्यांच्यातील आनंदी भावना आणि शाळेविषयी प्रेम निर्माण होण्याची भूमिका यानिमित्ताने तयार झाल्याचे दिसून आले.कार्यक्रमाला एकनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब घोरपडे,ज्येष्ठ अध्यापक प्रकाश दहिफळे,कैलास नजन,महिला शिक्षका श्रीमती भागवत मॅडम,श्रीमती आशा फड मॅडम यांनी विशेष उपस्थिती लावत आणि संवाद साधून शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. 'सुंदर रांगोळ्यांनी लक्ष वेधले!' ----------------- 'घरघर संविधान अंतर्गत' रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. मुलांनी अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. या रांगोळ्यातील कलाकुसर आणि रंगरंगोटी आणि सौंदर्य पाहण्यासाठी उपस्थित आणि एकच गर्दी केली. कार्यक्रमाच्या शेवटी बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती गर्जे,सहशिक्षक अशोक गर्जे सर यांनी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आयोजनासाठी परिश्रम घेतले. चौकट ------- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखेफळ येथील मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती गर्जे आणि श्रीयुत अशोक गर्जे यांनी 'घरघर संविधान' अंतर्गत जनजागृतीसाठी घेतलेले विविध उपक्रम कौतुकास्पद असून पालक आणि महिला भगिनींची उपस्थिती अत्यंत समाधानकारक आहे, खूप याचा आनंद वाटला! ----- श्रीमती आशाताई फड ( सहशिक्षिका)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या