Ticker

6/recent/ticker-posts

पाटील ड्रायक्लिनर्स दुकानाचा आ.सुरेश धस यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ

आष्टी (प्रतिनिधी) कोणताही व्यावसाय हा जिद्द,चिकाटी,मेहनत याशिवाय यशस्वी होत नाही.बेलगांव येथील तरुणांनी आष्टी,कडा अ.नगर शहरात व्यावसायात मुसंडी मारली आहे.अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाने व्यावसायात गरुडझेप घेतली जाते.याचा साक्षात्कार बेलगांव येथील नवोदित उद्योजक तरुणांना झलेला आहे. बेलगांवचे शेकडो तरुण व्यावसायात आले आणि यशस्वी झाल्याचे सिध्द झाले आहे.आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील रोहन पोकळे व वैभव पोकळे या दोन तरुणांनी आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात पाटील ड्रायक्लिनर्स या दुकान सुरु केले आहे.या दुकानाचा शुभारंभ रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी आ.सुरेश धस यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी सामाजिक,
राजकीय,व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रोहन पोकळे व वैभव पोकळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या