आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील भगवान महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या 'करिअर कट्टा' या उपक्रमा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागाचा बीड जिल्हा उत्कृष्ट महाविद्यालयाचा द्वितीय आणि बीड जिल्हा उत्कृष्ट समन्वयक प्रथम अशा दोन पुरस्काराने मंगळवार दि.१८ मार्च रोजी देवगिरी महाविद्यालय,छत्रपती संभाजीनगर येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ व महाविद्यालयाचे करिअर कट्टाचे समन्वयक प्रोफेसर शिवाजी पवार यांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अशोक तेजनकर,छत्रपती संभाजीनगर उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. रणजीतसिंह निंबाळकर,प्राचार्य डॉ.संजय खरात,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.महाविद्यालयामध्ये करिअर कट्टा अंतर्गत घेतलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत.या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ,समन्वयक प्रोफेसर शिवाजी पवार व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य व संस्थेचे सहसचिव डॉ.अजय धोंडे संस्थेचे सर्व प्रशासन अधिकारी व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.