आष्टी (प्रतिनिधी)
संसारातील कोणत्याच गोष्टींनी कोणाचीही तृप्ती होत नसते.संसार सुखाचे मागे जाऊनही मानव अखेर अतृप्तच राहत असतो.आपण श्रीकृष्णाच्या चरित्राचे उच्चारण करतो मात्र व्यवहारात आणि आचरणात मात्र विसंगती आढळून येते कृष्णाच्या चरित्रातील दहीदुधाची चोरी या गोष्टीतून त्यांनी अध्यात्म कारण,भक्ती कारण,समाजकारण आणि राजकारण अशी चार कारणे आहेत असे सांगत श्रीकृष्णाने गोकुळात केलेले चरित्र उच्चारले जाते " केले देवे गोकुळी दश चरित्रे " उच्चारली जावीत असा वारकरी संप्रदायाचा,
काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे.दुर्मिळ असणारा काला आपल्याला मृत्यु लोकात साधु संतांमुळे मिळतो असे प्रतिपादन ह.भ.प.संतोष महाराज मोरे यांनी केले.
आष्टी शहरातील वसंतनगर येथील श्री जगतगुरु तुकाराम महाराज मंदीरात सुरु असलेल्या ३७५ वा.त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी संत तुकाराम महाराज बीज अखंड विठ्ठल नाम सप्ताह सोहळ्यात ह.भ.प.संतोष महाराज मोरे बोलत होते.
यावेळी राजेंद्र धोंडे,सरपंच सौ.शालन मुळे,माजी सरपंच सौ.आदिकाताई लोखंडे,सौ.चंद्रकला नालकोल,सौ.धोंडे, सौ.मुक्ता खेडकर, छानबाई पाटील,राम ससाणे सर,घनशाम खलासे,त्रिंबक ईजारे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,अशोक डोके सर, किसनराव रासकर,हरिचंद्र बोडखे सर,सोनाजी बनकर महाराज,सोपान जोगदंड,अमोल बळे महाराज,हौसराव आजबे महाराज,उध्दव विधाते,लाला महाराज राक्षे,अशोक काकडे, गोपीनाथ पोकळे, बाळासाहेब रासकर,प्रा.सुभाष रासकर,प्रकाश खेडकर,पंडुरंग पोकळे,बलभीम धोंडे,शिवदास केरुळकर,प्रा.सदीप रासकर,नानासाहेब तवले,अनारसे सर, शाहुराव लाड,पुष्पाताई शिंदे,मुक्ताताई गणगे, फुलाबाई,कुसुमताई काळे,आदि मान्यवर उपस्थित होते.
" कंठी धरीला कृष्णमणी ।
अवघा जनी प्रकाश,
काला वाटू एकमेका।
वैष्णव निका संभ्रम,
वाकुलिया ब्रम्हादिकां ।
उत्तम लोका दाखवूं
तुका म्हणे भूमंडळी ।
आम्ही बळी वीर गाढे "
या संत तुकाराम महाराज यांच्या अंभगावर काल्याचे कीर्तन केले.पुढे बोलताना ह.भ.प. मोरे महाराज म्हणाले की,काला तीन प्रकारचा असतो.स्थुल देहासाठी दही -लाईचा काला,सुक्ष्म देहासाठी हरीनामाचा काला आणि कारण शरीरासाठी (आत्मस्वरुपाचे अज्ञान) जीव शिवाचा काला असतो.स्थुल कृपेचा काला,सुक्ष्म कृपेचा काला,द्रुक (दर्शन,

दृष्टी) कृपेचा काला आणि संकल्प कृपेचा काला असतो.संत महात्मे देवाची अनुभुती घेतात आणि ईतर भक्तांना देवाची अनुभुती करुन देतात असेही ह.भ.प.मोरे महाराज यांनी सांगितले.
0 टिप्पण्या