


आष्टी (प्रतिनिधी)
कुठल्याही सेवेत रुजू झाल्यानंतर आपल्या हातून ३८ वर्षात जी सेवा घडते.आपल्या आयुष्यातील मौलिक असते.आपल्या सेवेवरची निष्ठा आपल्याकडून काम करवून घेत असते.कौटुंबिक आयुष्यासाठी जी धडपड सुरु असते त्याची सफलता त्या परिश्रमात दडलेली असते सेवापूर्ती होणाऱ्या कर्मचाऱ्याचा सेवागौरव होणे महत्त्वाचे असते.सलग ३८ वर्षे अविरत शिक्षण विभागात सेवा करणाऱ्या भाऊसाहेब थेटे यांचा सेवापूर्तीनिमित्त सेवागौरव होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी आ.साहेबराव दरेकर यांनी केले.
आष्टी येथील श्री गणेश विद्यालयातील वरिष्ठ लिपीक भाऊसाहेब थेटे यांच्या सेवापूर्तीनिमित्त सेवागौरव कार्यक्रमात ते अध्यक्षस्थाना वरुन बोलत होते.
यावेळी बीड जि.प.चे.माजी सदस्य देविदास धस,जि.प.चे सदस्य डॉ.मधुकर हंबर्डे,विठ्ठलराव बन्सोडे,बीड जि.प.चे माजी सतीषमामा झगडे,सदस्य कडा डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डाॕ.पंडीत खिलारे,पुर्व शिक्षण अधिकारी विक्रम पोकळे,प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे,संस्थेचे अध्यक्ष शशीकांत खाडे,संस्थेचे सचिव महेश सावंत,नामदेव राऊत,उत्तम बोडखे,ॲड.कांतीलाल गव्हाणे,लक्ष्मण रेडेकर,रामराव झांजे,ज्ञानदेव रेडेकर,शांतीलाल रेपाटे,प्रा. ज्ञानेश्वर नवले,रोहिदास गि-हे,भाऊसाहेब कोकणे,विठ्ठल बांदल,ॲड.नवनाथ विधाते,विजयाताई संत्रे,सुभाष रासकर, गोरख पारखे,टि.आर.ईजारे,लहु करपे,पोपट घुले, बाळासाहेब थेटे,पोपटराव खाडे,मधुकर वांढरे,सुमनबाई थेटे, रामदास भगत,सुभाषशेठ चोरबले,वामनराव निकाळजे, निळकंठ सुंबरे,प्रा.विक्रम खेडकर,अशोक गाडेकर,दत्तात्रय ढोबळे,गणेश काकडे, हिराबाई तरटे,राजकुमार थेटे,रोहित चौधरी,ज्योतीराम कोकणे,दिपक वांढरे,राजेंद्र लाड,दादासाहेब खाडे,हरिभाऊ जाचक आदि सामाजिक,राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आ.साहेबराव दरेकरनाना म्हणाले की, समाजात अंधश्रध्दा वाढत आहे.सरस्वतीला मी मानणारा नाही तर मी सावित्रीबाई फुले यांना मानणारा माणुस आहे. शिकलेल्या महिलासुध्दा सरस्वती पुजन करतात हे दुदैवी बाब आहे.अहो ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले
छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र होता. त्यानंतर फुले,शाहु , आंबेडकर यांचा महाराष्ट्र होता.आता आता वाचाळवीरांचा महाराष्ट्र होऊ पाहत आहे.ते थांबले पाहिजे.या गणेश शिक्षण प्रसारक मंडळाने आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम केलेले आहे.यावेळी देवीदास धस म्हणाले की,गणेश विद्यालय ही शाळा एक आदर्श व शिस्तप्रिय शाळा आहे.या विद्यालयाने हजारो उच्च शिक्षीत विद्यार्थी घडविले.थेटे सर यांनी अनेक विद्यार्थी घडविले.सत्कारमुर्ती भाऊसाहेब थेटे यांनी शाळेत जशी शिस्त लावली तशीच शिस्त कुटुंबातील सदस्यांना लावली आहे असे देवीदास धस यावेळी म्हणाले.
यावेळी प्रस्ताविक मुख्याध्यापक तथा संस्थेचे कोषाध्यक्ष रमेशसिंह भगत यांनी केले.यावेळी ह.भ.प.कारभारी धस महाराज, पोपटराव खाडे,विक्रम पोकळे,नामदेव राऊत,स्नेहल थेटे,बीड जि.प.चे माजी सदस्य डाॕ.मधुकर हंबर्डे,बीड जि.प.माजी सदस्य सतीषमामा झगडे यांची भाषणे झाली.यावेळी संचालन नवनाथ मोरे तर आभार अशोक गाडेकर यांनी मानले.
-------------------------
0 टिप्पण्या