Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य सैनिक थोरवेदादा हे अलौकिक,लोकोत्तर व्यक्तीमत्व होते.. ---- ह.भ.प.गोविंद महाराज जाटदेवळेकर...... स्वातंत्र्य सेनानी वै.थोरवेदादा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास संत,महंत,महाराज,माजी आ. धोंडे,दरेकर,आजबे,देवीदास धस यांची उपस्थिती

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील अनेक राष्ट्रभक्तांनी स्वातंत्र्य चळवळीत हिरिरीने भाग घेऊन एकदाचा मराठवाडा स्वतंत्र करून घेतला.यामध्ये सक्रीय सहभाग थोर स्वातंत्र्य सेनानी साहेबराव थोरवे (दादा) होते.अशा या दैदिप्यमान,प्रकाशमय यशस्वी लढ्याचे सारथ्य करणाऱ्या अनेक राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्तांच्या या लढ्याचे साक्षीदार असलेले आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडीचे वै.साहेबराव थोरवेदादा होते.स्वातंत्र्य सैनिक थोरवेदादा हे अलौकिक, लोकोत्तर व्यक्तीमत्व होते असे प्रतिपादन ह.भ.प.गोविंद महाराज जाटदेवळेकर यांनी केले. आष्टी तालुक्यातील सोलापूरलडी येथे थोर स्वातंत्र्य सेनानी परमपूज्य वै.साहेबरावदादा थोरवे यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील काल्याचे कीर्तन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ.साहेबराव दरेक,माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ.बाळासाहेब आजबे,देवीदास धस,विजय गोल्हार, शंकर देशमुख,राजाभाऊ दरेकर,डाॕ.मधुकर हंबर्डे, बाबुशेठ भंडारी,के.के.काळे,पत्रकार उत्तम बोडखे,कल्याण पोकळे,डाॕ.पांडुरंग चौधरी,शिवाजी डोके महाराज, शिरीषभाऊ थोरवे,नायब तहसिलदार भगीरथ धारक,सुरेश काळे, महादेव डोके,बाळासाहेब थोरवे,हनुमान जंजीरे,इंजि.रमेश ढोबळे पाटील,जे.आर.पवार,महादेव मुंगसे,रमेश ढगे,सरपंच भीमराव बोडखे,प्राचार्य रविकांत सुंबरे,अर्जुन काकडे,दशरथ ढगे,संजय थोरवे,पांडुरंग गावडे, बाळासाहेब मिसाळ,ह.भ.प.सुद्रिक महाराज,ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कराळे,ह.भ.प.रक्टाटेदादा,ह.भ.प. राऊत दादा,ह.भ.प.मगर महाराज,ह.भ.प.दिनकर तांदळे महाराज,सुखलाल मुथा,आर.डी.ढोबे,ॲड.सायंबर,खटके, आदि सामाजिक,राजकीय,धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह.भ.प,जाटदेवळेकर महराज म्हणाले की,सकाळी श्रीमंतासारखे दुपारी मध्यम वर्गीयांसारखे तर रात्री भिका-यासारखा जेवन करावे म्हणजे आर्युमान वाढते.अल्प आहाराने शरीरावर व मनावर नियंत्रण येते.मासांहारी आहाराने तमो गुणी माणुस होतो.मसाल्याचा आहार केल्याने रजोगुणी माणुस होतो.सात्वीक आहाराने सात्त्विक विचारांचा माणुस होत असतो.थोरवेदादा एक वेळ आहार घेत असत.तो पण सुर्योदयापुर्वी म्हणून त्यांना १२५ वर्षाचे आयुष्य लाभले होते.दादांनी तरुणपण देशाला वाहिले.मन,शरीर नियंत्रणात ठेवले.अंतीम टप्यात मोठ्या प्रमाणात अन्नदान केले. संताकडे अभिमान नसतो अभिमान असतो ते संतच नसतात असेही जाटदेवळेकर महाराज म्हणाले.पतिव्रता ही ब्रम्ह,विष्णु,महेश या तिन्ही देवतांना एकत्रीत बाळ बनवु शकते.एकनिष्ठता ही कृष्णमणीअसतो.उत्तम पतिव्रता,मध्यम पतिव्रता,अधम पतिव्रता असतात.भगवंताचे सतत नाम कंठात आसलेल्या माणसाची पवीत्र वाणी,पवीत्र देह असतो.साधु संताच्या आशीर्वादानेच काल्याचा प्रसाद मिळतो.संत आपल्या जवळ आलेल्यांना आपल्यासारखे करुन टाकतात.कीतीही मोठे असलात तरी लहाण मुलांसारखे भांडणे,वाद सोडून सहन करता आले पाहिजे. म्हणजे हत्ती होऊन अंकुशाचा मार खाण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी.हे तत्व माणसाने जीवनात पाळावे मग नक्की आनंद,समाधान मिळेल असे शेवटी सांगितले.यावेळी उपस्थितीतांचे ॲड.हनुमंत थोरवे व युवानेते धैर्यशील थोरवे यांनी आभार मानले.प्रज्ञाचक्षु ह.भ.प.मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी यावेळी भ्रमणध्वनीवरुन थोरवेदादांना श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कराळे,देवीदास धस,माजी आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर यांनी श्रध्दांजली अर्पण केली. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या