


आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील जागृत देवस्थान असलेल्या महेश मंदिराचा महाशिवराञीनिमित्त दि.२६ ते २८ फेब्रुवारी २०२५ असा तीन दिवस याञा उत्सव संपन्न झाला.शुक्रवारी जंगी हंगाम्यात महाराष्ट्र केसरी सईद चाऊस आणि कडा कृ.उ.बा.समितीचे उपसभापती नामदेव धोंडे यांचे चिरांजीव निखील धोंडे यांची २५ हजार रु ची दवंडीची कुस्ती झाली.बुधवारी सकाळी ज्योत सोहळा,रात्री कीर्तन झाले. गुरुवारी छबीना व पालखी मिरवणुक झाली.करमाळा हलगी पथक,शोभेच्या दारुची अतीषबाजी झाली.शुक्रवारी सकाळी ९ वा.
कै.तुकाराम खेडकर व पांडुरंग मुळे लोकनाट्य तमाशा मंडळाच्या हजे-या झाल्या.रात्री
मराठी परंपरा जोपासणारा पारंपारिक कै.तुकाराम खेडकर व पांडुरंग मुळे लोकनाट्य तमाशा लोकगीते,लावणी, बतावणी,सोबत वेस्टर्न नृत्याविष्कार असा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी ३ ते ६.३० या वेळात भव्य जंगी कुस्त्यांचा हंगामा झाला.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे उपस्थित होते. शनिवार दि.१ मार्च रोजी सायंकाळी ७ वा.मयुरी उत्तरेकर कोल्हापूरकर यांचा मराठी हिंदी गाण्यांचा आर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.शुक्रवारी ४ ते ६.३० यावेळात जंगी कुस्त्यांचा हंगामा झाला.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे यांनी सर्व पैलवानास बक्षीस दिले.यावेळी महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, पोलीस अधिक्षक बजरंग बन्सोडे,पो.नि.राजु बन्सोडे,सरपंच तात्या नालकोल,उपसभापती नामदेव धोंडे,राजेंद्र धोंडे, अभयराजे धोंडे,पत्रकार उत्तम बोडखे,माजी सरपंच संजय नालकोल, प्रा.डाॕ.बाळासाहेब धोंडे,सेवानिवृत पीएसआय शेख अन्सारभाई,इंजि.पी.बी.बोडखे,चेअरमन बबन नन्नवरे,गोरख तावरे,प्रा.आर.जी.विधाते,आनंदराव बन्सोडे,चेअरमन दादासाहेब हजारे,रामदास धोंडे,पोलीस बबन पवार,चेअरमन दादासाहेब हजारे,शिवाजी नालकोल, आजिनाथ नलकोल, दादासाहेब काळे,भाऊसाहेब बन्सोडे आदि मान्यवर उपस्थित होते.या जंगी हंगाम्यात महाराष्ट्र केसरी सईद चाऊस आणि निखील धोंडे यांची २५ हजार रु ची दवंडीची कुस्ती झाली.मयुर तांबे आणि साहील शेख,ओम आंधळे,तुषार खांडवे यांच्या कुस्ती झाली.अमोल दिंडे आणि मयुर कणसे,शिवनाथ वनवे अशोक मोटे,अमृत कर्डीले,राम क्षीरसागर यांंच्या कुस्त्या झाल्या.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे यांनी वैयक्तिक कुस्त्या करणाऱ्या पैलवानांना बक्षीस दिले.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे, सरपंच तात्या नालकोल,उपसरपंच विष्णु मांढरे,माजी सरपंच नामदेव धोंडे, पांडुरंग धोंडे,अनिल गाजघाट,संजय नालकोल,पोपटनाना बन्सोडे, बबनराव औटे,पैलवान जालींदर पोकळे,पैलवान आजिनाथ विधाते हबीब शेख,हनुमान झगडे,बंडु माने,कल्याण कसाब, आण्णा क्षीरसागर,बंडु नालकोल,आजिनाथ बन्सोडे, बाप्पासाहेब खिलारे,आदिनाथ कन्हेरकर,प्रा.जी.पी.बोडखे,चंद्रकात तुपे,सुभाष धोंडे,
उपप्राचर्य संजय धोंडे,प्रा.श्रीकांत धोंडे,दादासाहेब नालकोल,बाळसाहेब नालकोल,अशोक फरांडे,योगेश फरांडे, बबन फरांडे,दशरथ कन्हेरकर,शरद आप्पा नालकोल,हनुमंत सासवडे,छगन खोडके,शिवाजी नालकोल,राजेंद्र गांजुरे फौजी,
मारुती शिवरकर,अनिल नालकोल,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आदि उपस्थित होते.या हंगाम्यात आष्टी,बीड,आकलुज, मंगरुळ,केरुळ,माहिजळगांव,
बेलगांव,कडा,कर्जत आदि गावचे पैलवान कुस्तीसाठी आले होते.
------------------
0 टिप्पण्या