आष्टी (प्रतिनिधी)
थोर स्वातंत्र्य सेनानी परमपूज्य वै.साहेबरावदादा थोरवे यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ दि.२२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला आहे.स्वातंत्र्य सैनिक वै.थोरवेदादा पुण्यतिथी सप्ताहात सोहळ्यात आज शनिवार दि.१ मार्च


२०२५ रोजी प्रज्ञाचक्ष ह.भ.प.मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.या काल्याचे कीर्तनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अॕड.हनुमंत साहेबराव थोरवे,युवानेते धैर्यशिल हनुमंतराव थोरवे यांनी केले आहे.
सप्ताहात व्यासपीठ चालक म्हणुन मुळेवाडी येथील श्री दत्त योगीराज आश्रमचे अध्यक्ष
रामायणाचार्य ह.भ.प.रविंद्रनाथ महाराज सुद्रिक पाटील,श्री दत्त योगीराज आश्रमचे ह.भ.प.सुदर्शन महाराज जाधव यांनी काम पाहीले.या सप्ताहात काकडा,विष्णु सहस्त्रनाम,शनिवारी कडा येथील संत मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,रविवारी ह.भ.प.रक्ताटे दादा महाराज (लोणी),सोमवारी ह.भ.प.राऊतदादा महाराज (पिंपळेश्वर संस्थान,पिंपळा),मंगळवारी ह.भ.प.निवृत्ती बोडखे दादा महाराज (आनंदवाडी),ह.भ.प.रामेश्वर महाराज ढाकणे (आळंदी देवाची),ह.भ.प.रविंद्रनाथ महाराज सुद्रिक पाटील, ह.भ.प.डॉ.गुरुवर्य सारुक महाराज (बीड) यांचे हरिकीर्तन झाले.आज शनिवारी सकाळी १० ते १२ यावेळात ह.भ.प. प्रज्ञाचक्ष गुरुवर्य मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. परमपूज्य कर्मयोगी दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
यावेळी आजी,माजी आमदार,सामाजिक,राजकीय,धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या सप्ताहात अध्यात्मिक बाल संस्कार वारकरी मुळेवाडी गुरुकुल विद्यार्थी यांचा सहभाग होता.आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी (खुंटेफळ) येथील या सप्ताहास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
अॕड.हनुमंत साहेबराव थोरवे,युवानेते धैर्यशिल हनुमंतराव थोरवे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या