Ticker

6/recent/ticker-posts

११ वर्षापासुन शिवनेरी ते सांगवी पाटण शिवज्योत आणणारा शिवभक्त समीर शेख

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील उच्चशिक्षित युवक समीर शेख गेल्या ११ वर्षांपासून शिवनेरी किल्ल्यावरून सांगवी पाटणपर्यंत पायी शिवज्योत आणत आहे.यामागील उद्दिष्ट म्हणजे समाजात एकता व सर्वधर्मसमभावाचा संदेश पसरवणे.समीर शेख यांनी सामाजिक कार्यात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे.त्यांच्या सोबत अनेक युवक जाती-धर्माचे भेद बाजूला ठेवून या उपक्रमात सहभागी होतात.या उपक्रमामुळे समाजामध्ये एकात्मतेचा आणि शिवरायांच्या विचारांचा प्रचार होतो.समीर शेख हे एम.एससी.,बी.एड.,एम.एड.पर्यंत शिक्षण घेतलेले आहे.ते समतावादी
विचारसरणीचे आहेत. समाजासाठी समर्पित आहेत.यंदाही त्यांनी गावातील ५० मावळ्यांसह शिवनेरी ते सांगवी पाटण हा २०० किलोमीटरचा प्रवास एका दिवसात पूर्ण केला.शिवज्योत गावात आणताना संपूर्ण रथ सजवून,पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.समीर शेख म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना जाती-धर्माचा भेदभाव केला नाही.त्यांनी १८ पगड जातींना सोबत घेतले.त्यांची हीच शिकवण माझ्या मनामध्ये रुजली आहे.गेल्या ११ वर्षांपासून मी पायी ज्योत आणत आहे.आपण कोणत्या जाती किंवा धर्मात जन्माला आलो.हे आपल्या हातात नसते परंतु सर्व जाती-धर्मांचा सन्मान करणे हे आपल्या हातात आहे.समीर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांचा हा उपक्रम लोकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.अशा माध्यमातून शिवरायांचे विचार घरोघरी पोहोचत आहेत आणि समाजात एकता टिकवण्याचा संदेश दिला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या