
आष्टी (प्रतिनिधी)
पत्नी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रमाणिकपणे अध्यापनाचा कार्य करते तर पतीदेव आपल्या पत्रकारितेचे माध्यमातून गोरगरीब,दीन दलित दुबळ्या,अनाथ,अपंग,शेतकरी,शेतमजूर आणि वंचित घटकांचे प्रश्न गेली ३५ वर्षे अव्याहतपणे,सातत्याने आणि अविरत लेखणीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणारे अशा संगमातून सामाजिक दायित्वाची भावना घेत पुढे चाललेल्या बोडखे परिवाराच्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांच्या वर्षावाने परिवार अक्षरशः भारावून गेला.आष्टी येथील वरिष्ठ पत्रकार दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे आणि त्यांच्या पत्नी शिक्षिका सौ.बबीताताई बोडखे यांच्या लग्नाचा वाढदिवस काल होता.यानिमित्ताने राजकीय,सामाजिक,धार्मिक,वैचारिक,शैक्षणिक,
सांस्कृतिक आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि गुणीजनांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि अनेक जणांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्या कार्याला अभिनंदन करीत लग्न वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या.
उस्फुर्त लोकांच्या सद्भावना प्रेम,जिव्हाळा,आस्था,माया आणि शुभेच्छांचा वर्षाव पाहून बोडखे परिवार अक्षरशः भारावून गेला.आपण करत असलेल्या कार्याचे चीज झाले ही भावना यावेळी परिवाराची झाली असल्याचे ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी सांगितले.एकूणच,प्रत्येक माणूस हा सामाजिक देणं लागतो या भावनेतून कर्तव्य करीत राहिल्यास स्वतःला समाधान आणि इतरांसाठी सुद्धा जगण्याची भावना फलद्रूप झाल्याची संवेदना जागी होते. या दृष्टिकोनातून अनेक जणांनी केलेले कौतुक आणि शुभेच्छा यांचे उत्तम बोडखे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या