आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री गणेश विद्यालयातील अधिक्षक भाऊसाहेब मार्तडराव थेटे यांचा शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी आष्टी येथील श्री गणेश विद्यालयात सकाळी १० वा.सेवापूर्ती सोहाळा होत आहे.यावेळी विशेष उपस्थिती आ.सुरेश धस यांची लाभणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आ.साहेबराव दरेकर राहणार आहेत.बीड जि.प.चे.माजी सदस्य देविदास धस,जि.प.चे सदस्य डॉ.मधुकर हंबर्डे,कडा डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डाॕ.पंडीत खिलारे,भुतपुर्व शिक्षण अधिकारी विक्रम पोकळे,नामदेव राऊत,लक्ष्मण रेडेकर,पत्रकार उत्तम बोडखे,पोपटराव खाडे,मधुकर वांढरे,भाऊसाहेब कोकणे,संस्थाध्यक्षा श्रीमती सुमनबाई थेटे,रामदास भगत,दत्तात्रय ढोबळे,शशिकांत खाडे, गणेश काकडे,महेश सावंत,श्रीमती हिराबाई तरटे,राजकुमार थेटे,
पोपटराव घुले,रोहित चौधरी,ज्योतीराम कोकणे,दिपक वांढरे आणि सुप्रभात ग्रुप सदस्य उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अशोक गाडेकर,
मुख्याध्यापक रमेश देसुरकर,
सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले आहे.भाऊसाहेब मार्तंडराव थेटे यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९६७ रोजी आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा येथे झाला.पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव चोभा झाले.१९८० पासून त्यांचे पुढील शिक्षण ८ वी.ते १० वी.पर्यत न्यू हायस्कूल दावरवाडी (ता.पैठण) येथे झाले.गणेश शिक्षण संस्थेचे संस्थापक कै.किसनराव गणपतराव थेटे पाटील हे शिक्षक असल्यामुळे त्यांचेकडेच दावरवाडी येथे पूर्ण झाले.आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालय १९८३ ते १९८८

बी.ए.ही पदवी पूर्ण केली.श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.किसनराव गणपतराव थेटे यांच्या पुण्याईने त्यांची कनिष्ठ लिपिक म्हणून १ आॕगस्ट १९८८ रोजी श्री गणेश विद्यालय आष्टी या ठिकाणी नेमणूक झाली. १९९४ ला त्यांनी शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई याठिकाणी बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले.त्यांचे लग्न १९८८ रोजी झाले.त्यांना दोन कन्या आणि एक मुलगा अशी अपत्य आहेत.
थोरली मुलगी कोमल तिचे शिक्षण मास्टर ऑफ आर्ट पूर्ण केले आहे.सध्या जिल्हा परिषद कन्या शाळा याठिकाणी कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.दुसरी कन्या स्नेहल तिचे शिक्षण बी.टेक.शासकीय महाविद्यालय परभणी या ठिकाणी पूर्ण केले. ती ग्राम महसूल अधिकारी म्हणून आष्टी याठिकाणी कार्यरत आहे.त्यांचा मुलगा श्रीनिवास भाऊसाहेब थेटे हाही बी.टेक.झाला आहे.तो सोलाशेस कंपनीमध्ये सुरत या ठिकाणी कार्यरत आहे.ते ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.
0 टिप्पण्या