आष्टी (प्रतिनिधी)
रमेशदादा आजबे यांच्या सावळेश्वर ट्रॅक्टर्स शोरुम धोंडे पेट्रोल पंपासमोर शीभारंभ होत आहे.या शोरूमचा आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर आ.सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी माजी आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,मुरलीधर आजबे,सतीश शिंदे, सभापती बद्रीनाथ जगताप,डॉ.शिवाजी राऊत,काकासाहेब शिंदे, भाऊसाहेब घुले,सरपंच सुधीर पठाडे,दत्तात्रय खोटे,बबन कराडे,दादासाहेब जगताप,सुनिल सुर्यवंशी,सुभाष गणगे,सेवानिवृत्त नायब तहसीलदार शाहाजी गिते,पैलवान फिरोज बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.सुरेश धस म्हणाले की,
शेतकऱ्यांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ व सबरी आणि महात्मा फुले विकास महामंडळ या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करावा आणि स्वराज ट्रॅक्टर योग्य असून त्यांचा वापर योग्य पद्धतीने करावा रमेशदादा आजबे यांनी शेतकऱ्यांना सवलती द्याव्यात.


आजबे यांचे शोरुम अनेक जिल्ह्यांत असून ते योग्य उद्योजक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.ते शेतकऱ्यांना योग्य किंमतीत ट्रॅक्टर देत आहेत.सहकार्य करत आहेत तर शेतकऱ्यांनी शेती कामामध्ये ट्रॅक्टर व आधुनिक औजारांचा वापर करावा असेही प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले. यावेळी माजी आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे यांनी शोरुमच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. स्वराज ट्रॅक्टरचे वितरक रमेशदादा आजबे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.उपस्थितीतांचे आभार मानले.
या कार्यक्रमास सरपंच परिवत गायकवाड,सुभाष गणगे,कृष्णा काकडे,गणेश डोके,अकरम सय्यद,सलमान बागवान,गणेश डोके,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,अविनाश कदम,राजेंद्र लाड,अक्षय विधाते,संतोष नागरगोजे,सोपान पगारे आदी शेतकरी,नागरिक,व्यापारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
चौकट
----------
शेतकऱ्यांनी पहिल्याच दिवशी १९ ट्रॅक्टरची केली खरेदी...
------------------
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रथमच स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत डिलर सावळेश्वर ट्रॅक्टरचे डिलर रमेशदादा आजबे यांनी ग्राहकांना आकर्षक व्याजदर, आकर्षक किंमत व आकर्षक ऑफर दिल्याने सवलतीचा पहिल्याच दिवशी १९ ट्रॅक्टरची शेतकऱ्यांनी खरेदी केली.आकर्षक सवलत दिल्याने शेतकऱ्यांनी डिलर रमेशदादा आजबे यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या