आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरातील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांची तुफान गर्दी झाली. महाशिवरात्रीच्या प्रारंभी आ.सुरेश धस यांनी सपत्नीक महाभिषेक केला तर पहाटे ४ ते ७ वाजेपर्यंत सार्वजनिक अभिषेक संपन्न झाले.मात्र
यावर्षी भाविकांच्या प्रचंड गर्दीने आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त आष्टी शहरातील ग्रामदैवत असलेल्या पिंपळेश्वर महादेव मंदिरात पहाटे पासूनच भक्तांची रीघ लागली होती.आ.सुरेश धस व सौ.प्राजक्ताताई धस यांनी प्रारंभी महाभिषेक केला.
याप्रसंगी निवृत्त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे उपस्थित होते.पहाटे ४ ते ७ यावेळेत भाविकभक्तांनी भक्तांचे अभिषेक संपन्न झाले.सकाळी ७ वाजल्यापासूनच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भक्तांनी गर्दी केली होती.रात्री उशिरापर्यंत या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता.मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर सायंकाळी फटाक्याच्या आतषबाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते.आष्टी तालुक्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले.सायंकाळी पारंपरिक गोंधळ गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला तर भाविकांसाठी उपवासाच्या निमित्ताने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते.आज गुरुवार दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी शहरातून पारंपरिक वाद्यासह पिंपळेश्वर महादेवाच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा संपन्न होणार आहे. या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
चौकट
---------
शिव-पार्वती
रांगोळीने लक्ष वेधले.
----------------
मंदिर परिसरात कोमल भाऊसाहेब थेटे यांनी भगवान शिव-पार्वती रांगोळीच्या माध्यमातून साकारलेल्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले.सलग पाच तास ही रांगोळी काढण्यासाठी लागले. चार बाय सहा फुट आकारात ही रांगोळी साकारण्यात आली होती.मोफत चहाचे वाटप
शहरातील हॉटेल व्यावसायिक असलेले दत्ता राऊत यांनी भाविकांसाठी मोफत चहाचे वाटप केले.त्यामुळे आलेल्या प्रत्येक भाविकांनी याचा लाभ घेतल्याने ही अविरत सेवा कायम ठेवण्याचा संकल्प दत्ता राऊत यांनी केला.
0 टिप्पण्या