Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी येथे आज बेलेश्वर मंदिरात ह.भ.प.गणेश महाराज कुदळे यांचे काल्याचे कीर्तन

आष्टी (प्रतिनिधी) साधु संतांच्या आशीर्वादाने आष्टी येथील सावता नगरातील बेलेश्वर मंदीरात दि.२३ फेब्रुवारी पासुन पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिला अमृत सोहळा सुरु झाला आहे. या सप्ताहातील आज गुरुवार दि.२७ फेब्रुवारी रोजी रामायणाचार्य ह.भ.प.गणेश महाराज कुदळे (चिंचोडी शिराळ) यांचे सकाळी १० ते १२ यावेळात काल्याचे कीर्तन होणार आहे. सप्ताहात दिप प्रज्वलन आष्टी तालुका वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष ह.भ.प.दिनकरराव तांदळे,ग्यानदेव धोंडे,संपतराव धोंडे,विणापुजन बलभीम रंगनाथ धोंडे,हौसराव आजबे महाराज,ध्वजपुजन उद्योगपती आण्णासाहेब चौधरी,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,एन.टी.गर्जे,प्रा.मोहन धोंडे,प्रा.डॉ.बापुराव उर्फ सुर्यकांत धोंडे,ग्रंथपुजन डॉ.अजयदादा धोंडे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,चेअरमन बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते झाले.या सप्ताहात काकडा भजन,विष्णु सहस्त्रनाम, शिवलिला अमृत ग्रंथपारायण,हरिपाठ,हरिकिर्तन होत आहे.सप्ताहात ह.भ.प.निवृत्ती महाराज बोडखे (आनंदवाडी),बालकीर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वरीताई महाराज पौळ,ह.भ.प.श्रीहरि महाराज पुरी (आष्टी),ह.भ.प.विष्णू महाराज लिंबोडीकर (रामगड संस्थान देविनिमगांव) यांचे कीर्तन झाले.आज गुरूवार दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते १२ वा.या वेळात ह.भ.प.रामायणाचार्य गणेश महाराज कुदळे (चिंचोडी शिराळ) यांचे काल्याचे हरिकीर्तन होत आहे.त्यानंतर बेलेश्वर मित्र मंडळ आष्टी यांची महाप्रसादाची पंगत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या