आष्टी (प्रतिनिधी)
थोर स्वातंत्र्य सेनानी परमपूज्य वै.साहेबराव (दादा) थोरवे यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ दि.२२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे.व्यासपीठ चालक म्हणुन मुळेवाडी येथील श्री दत्त योगीराज आश्रमचे अध्यक्ष
रामायणाचार्य ह.भ.प.रविंद्रनाथ महाराज सुद्रिक पाटील,श्री दत्त योगीराज आश्रमचे ह.भ.प.सुदर्शन महाराज जाधव हे काम पाहत आहेत.या सप्ताहात काकडा,विष्णु सहस्त्रनाम,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ,हरिकिर्तन,हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम होत आहेत. शनिवारी कडा येथील संत मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,रविवारी ह.भ.प. रक्ताटे दादा महाराज (लोणी),सोमवारी ह.भ.प.राऊतदादा महाराज (पिंपळेश्वर संस्थान,पिंपळा),मंगळवारी ह.भ.प. निवृत्ती बोडखेदादा महाराज (आनंदवाडी),ह.भ.प.रामेश्वर महाराज ढाकणे (आळंदी देवाची) यांचे हरिकीर्तन झाले.आज गुरूवारी ह.भ.प.रविंद्रनाथ महाराज सुद्रिक पाटील यांचे हरिकीर्तन होणार आहे.उद्या शुक्रवारी ह.भ.प.डॉ.गुरुवर्य सारुक महाराज (बीड) यांचे कीर्तन होणार आहे.आज शनिवारी सकाळी १० ते १२ यावेळात ह.भ.प.प्रज्ञाचक्ष गुरुवर्य मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.परमपूज्य कर्मयोगी दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील यांची
विशेष उपस्थिती आहे.या सप्ताहात अध्यात्मिक बाल संस्कार वारकरी मुळेवाडी गुरुकुल विद्यार्थी यांचा सहभाग होता.आष्टी तालुक्यातील



सोलापूरवाडी (खुंटेफळ) येथील या सप्ताहास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
अॕड.हनुमंत साहेबराव थोरवे,युवानेते धैर्यशिल हनुमंतराव थोरवे यांनी केले आहे.
-------------------
0 टिप्पण्या