Ticker

6/recent/ticker-posts

सराटेवडगावचे विलासराव कुलकर्णी यांचे निधन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील आदर्गाव सराटेवडगाव येथील महावितरण कंपनीतील सेवानिवृत अधिकारी विलासराव एकनाथ कुलकर्णी (वय ६९) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने कार निधन झाले.उजनी,परळी,गिरवली, सिरसदेवी येथे ३८ वर्षे महावितरण विभागात सेवाकाल घातला.विनातक्रार प्रमाणिकपणे सेवा केली.त्यांना महावितरण विभागातील उत्कृष्ट सेवेबद्दलचे अनेक पुरस्कार मिळाले होते.त्यांच्या पाठीमागे पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.सेवानिवृत झाल्यानंतर सराटेवडगाव येथे ११ वर्षे आपली शेती केली.शेतीत विविध प्रयोग केले.अधिकारी पदानंतर आदर्श शेतकरी म्हणून काम केले.सराटेवडगाव येथील सामाजिक,धार्मिक कार्यक्रमात ते सक्रीय सहभागी होत असत. अंत्यविधी सराटेवडगाव येथे झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या