

आष्टी (प्रतिनिधी)
आपली प्रत्येक कृती आणि त्या मागचा भाव हा राष्ट्रसमर्पनाचा व राष्ट्रहिताचा असावा.प्रमाणिक देशाभिमानी नम्र सेवाभावी आणि सर्हदयी तसेच माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडत जावे असे सांगत सुसंवाद हा माणुसकीचा धर्म असावा समाजसेवक शेख मैनुभाई यांच्या नावाने गुणवंताचा गौरव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन संत मदन महाराज बिहाणी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केले.
स्व.शेख मैनुद्दीन यांच्या स्मरणार्थ आदर्श पुरस्कार वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल आपल्या ओघवत्या शैलीतून विद्यार्थी आणि मान्यवरांना मार्गदर्शन करत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टीच्या तहसिलदार वैशाली पाटील होत्या.
यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,कडा ग्रा.पं.चे सदस्य भाऊसाहेब भोजने,महाराष्ट्र बास्केट बॉल प्रशिक्षक प्रा.डॉ.जमीर शेख,हरिभाऊ जंजिरे,युवराज सरोदे,मनोहर सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.स्व.मैनुद्दीन शेख स्मरणार्थ आदर्श पुरस्कार वितरण तसेच गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा रविवार दि.१२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीनिमित्त कडा येथील सद्गुरु हॉटेल - हॉल धामणगाव रोड,मदन महाराज मठासमोर पार पडला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती शेख नजमा यांनी केले.दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल आणि तहसिलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी आदर्श पत्रकार म्हणून दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक तथा जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,तेजवार्ता न्युज चॕनलचे संपादक सय्यद बबलूभाई, आज मराठी न्युज चॕनलचे संपादक अविशांत कुमकर,आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून श्रीमती उषाताई ढेरे,श्रीमती वैशालीताई झांजे,राजेंद्र लाड,प्रशांत दगडे,सुनिल अनारसे,आदर्श साहित्यिक म्हणून अनंत कराड,आदर्श डॉक्टर म्हणून डाॕ.शेख नदीम (आष्टी),डाॕ.सौ.मंजूश्री टेकाडे (कडा),आदर्श सेवक म्हणून पुरस्कार रोकडे शहादेव (मामा),तसेच गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षिका तथा कवयित्री श्रीमती शेख नजमा यांनी केले.तहसीलदार पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.या उपक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आदर्श पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले.गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कौतुक केले ह.भ.प. बहिरवाल महाराजांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले भविष्यातही अशीच कार्यक्रम घेण्यात यावे म्हणून शुभेच्छा दिल्या.सोनाजी बनकर सर मुख्याध्यापक वहाली यांनी या राबवलेल्या उपक्रमांचे मोठे वटवृक्ष वृक्ष व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या
हरिभाऊ जंजिरे यांनी स्व.शेख मैनुद्दीन यांच्या कार्याचे कौतुक केले.आदर्श शिक्षिका वैशाली झांजे यांनी बापाच्या स्मरणार्थ आदर्श पुरस्कार देणारी पहिली शिक्षिका म्हणून नजमा शेख यांची कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.आदर्श शिक्षकांना व राजेंद्र लाड दगडे प्रशांत यांनी देखील उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.डॉ.नदीम शेख यांनी स्व.मैनोद्दीन शेख यांच्या कार्याची स्तुती केली.आदर्श शिक्षिका शेख नजमा मॅडमला या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी सिद्धी पांडुरंग मानमोडे, रितेश मनोहर सरोदे,आकांक्षा आजिनाथ बोरा,अश्विनी कुमखाले,जैनब परवेज शेख,चैत्राली भरत गायकवाड या गुणवंत विद्यार्थ्यांचाही स्मृतीचिन्ह रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,साहित्यिक अनंत कराड,सुनिल अनारसे,वैशाली झांजे,राजेंद्र लाड,डाॕ.नदीम शेख,पत्रकार अविशांत कुमकर,प्रशांत दगडे यांची भाषणे झाली.या कार्यक्रमाचे संचलन संयोजक नजमा शेख यांनी तर आभार समीर शेख यांनी मानले.
0 टिप्पण्या