Ticker

6/recent/ticker-posts

जागृत शृंगेरीदेवी देवस्थानचा पौष पौर्णिमेचा यात्रा उत्सव आणि नवरात्र उत्सव

यात्रा उत्सव ------------- उत्तम बोडखे,आष्टी. ------------------
चौकट ------------- आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथील शृंगेरी देवी यात्रा उत्सवास दि.१३ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.हा उत्सव १५ दिवस चालतो.आज मंगळवार दि.१४ जानेवारी रोजी भव्य कुस्त्यांचे मैदान होणार असल्याची माहिती शृंगेरी देवी देवस्थान ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे.आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथील शृंगेरीदेवी देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते.देवस्थानावर वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात.यामध्ये नवरात्र उत्सव आणि पौष पौर्णिमेपासून सुरू होणारा यात्रा उत्सव हे दोन प्रमुख उत्सव साजरे होतात.यावर्षी दि.१३ जानेवारी रोजी पौष पोर्णिमा असल्याने दि.१३ जानेवारी यात्रा उत्सवात सुरुवात झाली आहे.हा उत्सव १५ दिवस चालतो.पौष अमावस्येला यात्रेचे सांगता होईल. दरम्यान १५ दिवसाच्या काळामध्ये शृंगेरीदेवी देवस्थानावर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात.त्यामध्ये आज दि.१४ जानेवारी रोजी शृंगेरीदेवी देवस्थान येथे भव्य कुस्त्यांची दंगल होणार असल्याचे माहिती शृंगेरीदेवी देवस्थान ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे.या यात्रा उत्सवामध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भावीकभक्त एक देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. ------------------------------ मनोभावे,पवित्र मनातून, श्रद्धायुक्त भावनेने,सातत्यपूर्ण आणि नतमस्तक होत भक्तिभावाने पूजा व आराधना केल्यास निश्चित फलप्राप्ती होते.या आजपर्यंतच्या एकूण स्थितीवरून आष्टी तालुक्याच्या ब्रम्हगांवच्या डोंगरमाथ्यावर भव्यदिव्य आणि निसर्गाच्या हिरव्यागार शालु पांघरलेल्या आणि मंदिरात स्थिरावलेली लाखो भाविक भक्तांची लाडकी देवी अर्थात देखण्या शृंगेरीमातेच्या दर्शनासाठी यात्रोत्सवात भक्तांची अलोट गर्दी असते.आठेगाव पुठ्याच्या श्रीक्षेत्र सावरगाव घाटपासून मुगगांव आणि तिकडे जाताना ब्रम्हगांवच्या डोंगर माथ्यावर अत्यंत दिमाखदार आणि भव्य दिव्य अशा सुंदर माथ्यावर शृंगारेदेवीची सुंदर मूर्ती भाविकांचे ध्यान आकर्षित करते आहे.शृंगारी देवीची आराधना हा भक्तांना एक अत्यंत आनंदाचा सोहळा असतो.भक्तांनी केलेले नवस या निमित्ताने येथे सदैव पूर्ण होतात अशी भक्तांची भावना आहे आणि पूर्ण झालेले नवस फेडण्यासाठी आणि नतमस्तक होण्यासाठी भाविकांची मांदियाळी हा येथील या देवीच्या पवित्र पावन भूमीत नित्याचा भाग आहे. आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथे असलेल्या श्रृंगेरीदेवी देवस्थान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा उत्सव साजरा होत आहे.या उत्सवादरम्यान देवस्थान येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आष्टी पासुन १२ कि.मि.अंतरावर आष्टी, पाटोदा तालुक्याच्या सिमेवर अतिशय निसर्गरम्य वातावरणात श्रृंगरीदेवी हे जागृत देवस्थान आहे.श्रृंगेरीदेवी देवस्थानावर वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात.यामध्ये पौष महिन्यात होणारा यात्रा उत्सव आणि नवराञ उत्सव हे दोन महत्वाचे उत्सव आहेत. श्रृंगेरीदेवी देवस्थानावर नेहमीच भक्तांची वर्दळ असते परंतु यात्रा उत्सव आणि नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातुन लाखो भक्त येतात.त्यामळे या दोन उत्सवांना वेगळे वेगळे महत्व आहे.दरवर्षी होणाऱ्या यात्रोत्सवात सर्वत्र हिंदू धर्म दैवतांची आराधना केली जाते.अत्यंत पवित्र अशा या कालावधीमध्ये प्रत्येक भक्त,भाविक,सज्जन नतमस्तक होऊन समाधान घेत असतो.देवीचे आशीर्वादासाठी प्रत्येक जण आतुर असतो.यात्रोत्सवात भाविकांच्या लाडकी असलेल्या श्रंगेरीदेवीच्या पायी नतमस्तक होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मनोभावे आलेली ही मंडळी देवीच्या चरणी नम्रपणे लीन होतात. आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथील श्रृंगेरीदेवी देवस्थान येथे यात्रा उत्सव सुरु झाला आहे.आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथील श्रृंगेरीदेवी हे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान आहे.श्रृंगेरी देवीगडावर वर्षभरात विविध उत्सव साजरे केले जातात.यामध्ये नवरात्र उत्सव आणि पौष पौर्णिमेला भरणारा यात्रा उत्सव हे प्रमुख दोन उत्सव आहेत.हा याञाउत्सव १५ दिवस चालतो.दर मंगळवार शुक्रवार या दिवसाशिवाय शनिवार,रविवारी सुट्टी असल्याने भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे.यात्राकाळात आष्टी येथील या गडावर जाण्यासाठी आष्टी आगारातून भाविकांच्या मागणीनुसार जादा बस गाड्याची व्यवस्था करण्यात येते.देवस्थानावर आनंदनगरी,खेळण्यांची,खाऊंची दुकाने आणि करमुणीकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या