
आष्टी (प्रतिनिधी )
७ वे.एकता मराठी साहित्य संमेलन दहिवंडी निमित्त देण्यात येणारे राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर झाले असून त्याचे वितरण १७ व १८ जानेवारी रोजी साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने संपन्न होणाऱ्या संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती एकता फाउंडेशन चे कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर व उपाध्यक्ष नितीन कैतके यांनी प्रसार माध्यमांना दिली.
प्रा.डाॅ.भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखालील पुस्तक परीक्षण समितीने पुस्तक परीक्षण अहवाल पुरस्कार निवड समितीकडे सुपूर्त केल्यानंतर निवड समितीतील पदाधिकारी तथा एकता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार यांनी पुरस्कारांची घोषणा केली.
कै.विश्वनाथ शंकरराव पवार (से.नि.पोस्टमास्तर) राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार विवेक उगलमुगले (नाशिक) यांच्या 'मनातल्या मनात वाचायच्या कविता' या काव्यसंग्रहास, कै.विश्वनाथ यादव कराड (गुरूजी) राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार अलकनंदा घुगे-आंधळे (संभाजीनगर) यांच्या 'अर्धा कोयता' आणि उमेश मोहिते (बीड) यांच्या 'खोडा' या कथासंग्रहास विभागून, स्वा.सै.गणपतराव बडे सार्व.वाचनालय लोणी ता.शिरूर का.जि.बीड राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार विठ्ठल खिलारी (सातारा) यांच्या 'सवळा' या कादंबरीस, कै.काशिनाथ आश्रुबा शिंदे (सर) राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार स्वाती कान्हेगावकर (नांदेड) यांच्या 'झाड एक मंदिर' या बालकादंबरीस, कै.वच्छलाबाई बाबासाहेब सानप (आदर्श माता) राज्यस्तरीय उत्कृष्ट ललित साहित्य पुरस्कार निर्मला शेवाळे (मुंबई) यांच्या 'करंजमाळ' या ललित संग्रहास, कै.परमेश्वर भागुजी कैतके (लाईनमन) राज्यस्तरीय उत्कृष्ट संशोधन/संपादन साहित्य पुरस्कार प्रा.रामदास केदार (लातूर) यांच्या 'पटकथा लेखन : तंत्र व कौशल्य' आणि प्राचार्य डाॅ.अरविंद कुंभार (विजयपूर-कर्नाटक) यांच्या 'पक्षांची दुनिया' या संशोधनपर पुस्तकास विभागून जाहीर झाले आहेत.एकताचे मार्गदर्शक तथा मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर चे माजी कोषाध्यक्ष, ग्रामीण कथाकार प्रा.डाॅ.भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे पुस्तक परिक्षण समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. कवितासंग्रह विभाग - देवीदास शिंदे (अहिल्यानगर), जयश्री वाघ (नाशिक), नागेश शेलार (बीड). कथासंग्रह विभाग - शिवाजी मरगीळ (परभणी), प्रा.डाॅ.द्वारका गिते-मुंडे (केज), प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर (उदगीर).कादंबरी विभाग - प्रा.डाॅ.भास्कर बडे (शिरूर कासार), प्रा.डाॅ.केशव अलगुले (लातूर), प्रा.रविंद्र कांगणे (नाशिक).बालसाहित्य विभाग - प्रा.इम्रान शेख (अहिल्यानगर), प्रा.डाॅ.राजश्री तावरे (धाराशीव), लक्ष्मण खेडकर (संभाजीनगर). ललित विभाग - प्रा.डाॅ.संगिता घुगे (नांदेड), प्रा.उद्धव थोरवे (जालना), ॲड.प्रताप वाघुंबरे (अहिल्यानगर).संशोधन/संपादन विभाग - प्रा.डाॅ.सुनिता सांगोले (लातूर), प्रो.डाॅ.सोपान सुरवसे (बीड), प्रा.डाॅ.श्रीहरी धोंड (जालना) यांनी समितीमध्ये परिक्षक म्हणून काम पाहिले.पुरस्कारार्थींना पुरस्कार स्विकारण्यासाठी संमेलनाच्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित रहावे लागेल. इतरांकडे अथवा संमेलनानंतर पुरस्कारांचे वितरण केले जाणार नाही असे एकता फाउंडेशन चे पदाधिकारी डाॅ.सचिन सानप, कैलास तुपे, लखुळ मुळे, दिपक महाले, मिरा दगडखैर, एड.भाग्यश्री ढाकणे, रंजना फुंदे,डाॅ.शोभा सानप, शोभा राजळे, रंजना डोळे, लता बडे, राजेश बीडकर, महादेव राऊत, फौजी कैलास खेडकर,मल्हारी खेडकर, हरिप्रसाद गाडेकर, माही शेख, पो.काॅ.ज्ञानेश्वर पोकळे,प्रा.महेश नागरे यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या