

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक
अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांचे माता-पिता स्मृतिप्रीत्यर्थ आष्टी येथील भगवान
महाविद्यालय मैदानावर गंगाई -बाबाजी महोत्सव २०२५ भगवान काॕलेजच्या आवारात दि.३०
जानेवारी ते १ फेब्रुवारी या तीन दिवशीय होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दि.३०
जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वा.माजी मंत्री प्रा.सुरेश नवले यांच्या हस्ते होणार
आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे हे
भुषविणार आहेत.या महोत्सवातील सर्व स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ
आष्टीकरांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.
उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १२ वा.वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या
महोत्सवात शेतकऱ्यांच्या मुलांचे लांबलेले विवाह एक सामाजिक समस्या, नितीमुल्यांचा
वाढता -हास आणि सामाजिक जीवन हे तीन विषय स्पर्धेसाठी आहेत. महाविद्यालयीन
स्नेहसंमेलन आणि वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे.दि.३० जानेवारी २०२५ रोजी काव्यवाचन
स्पर्धा,वक्तृव स्पर्धा,दि.३१ जानेवारी रोजी संस्थेतील शाळा, महाविद्यालयाचे
सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळचे सत्रात
मान्यवरांच्या हस्ते "गंगाई - बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण" दुपारचे
सत्रात सायंकाळी ४ खुल्या लावणी स्पर्धा होणार आहेत.दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी
सकाळी बक्षीस वितरण " गंगाई- बाबाजी " राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा
होणार आहे.या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती
ना.प्रा.राम शिंदे आणि अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी यांंच्या हस्ते पुरस्कार वितरण
होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आ.भीमराव धोंडे राहणार असुन प्रमुख
उपस्थिती युवानेते डाॕ.अजयदादा धोंडे यांची लाभणार आहे.प्रत्येक स्पर्धेचे बक्षीस
वितरण स्पर्धा संपताच केले जाईल.महोत्सव यशस्वी होण्यासाठी भगवान महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ,उपप्राचार्य डाॕ.ज्ञानदेव वैद्य,उपप्राचार्य डाॕ.
आप्पासाहेब टाळके,उपप्राचार्य सुनिल भवर,प्रा.डॉ.बाळासाहेब
गावडे,प्रा.डॉ.आबासाहेब पोकळे,प्रा.डाॕ.वंदना घोडके यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि
संयोजक समिती परिश्रम घेत आहेत. ********************
0 टिप्पण्या