Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे सेवानिवृत्त चालक तुकाराम राख यांचे निधन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहराजवळ काही दिवसांपूर्वी आष्टी आगारातील सेवानिवृत्त चालक तुकाराम राख (वय ५९)यांचा अपघात झाला होता.डोक्याला जबर मार लागल्याने ते एक महिन्यापासुन कोमात गेले होते.आज दुपारी अहमदनगर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.बसचालक तुकाराम राख यांनी परिवहन महामंडळात अंत्यत प्रामाणिकपणे,विनाअपघात,विनातक्रार सेवा केली आहे.आष्टी आगारात त्यांचा प्रदिर्घ सेवाकाल गेला आहे.एक वर्षापुर्वी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले होते.राख यांच्या निधनाने हाजीपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पार्थिवावर आष्टी तालुक्यातील त्यांच्या जन्मगावी हाजीपुर येथे आज रात्री ९ वा.अंत्यसंस्कार झाला.यावेळी राजकीय,सामाजिक, धार्मिक व परिवहन महामंडळातील वाहक,चालक,कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या