आष्टी (प्रतिनिधी)
सामाजिक कार्यकर्ते स्व.मैनुद्दीन शेख स्मरणार्थ आदर्श पुरस्कार वितरण तसेच गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा रविवार दि.१२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीनिमित्त सद्गुरु हॉटेल हॉल
धामणगाव रोड, संत मदन महाराज मठासमोर कडा येथे सकाळी १० वा.आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील या उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस,कड्याचे सरपंच युवराज पाटील यांच्या हस्ते गौरव सोहळा होणार आहे.आदर्श पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार सय्यद बबलूभाई,पत्रकार अविशांत कुमकर,आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीमती उषाताई ढेरे,श्रीमती वैशालीताई झांजे,राजेंद्र लाड,प्रशांत दगडे,सुनिल अनारसे,आदर्श साहित्यिक अनंत कराड,आदर्श डॉक्टर-डाॕ.शेख नदीम,डाॕ.सौ.मंजूषा टेकाडे,आदर्श सेवक पुरस्कार- रोकडे शहादेव (मामा),तसेच गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण होणार आहे.या गौरव सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आदर्श शिक्षिका तथा कवीयत्री श्रीमती शेख नजमा मैनुद्दीन समीर सर,शेख नईम,शेख नदीम यांनी केले आहे.







0 टिप्पण्या