
आष्टी (प्रतिनिधी)
चित्रपटातील हिरोसारखी आपलीही सिक्सपॅक शरीरयष्टी असावी असे सर्व तरुणांना वाटते परंतु त्यासाठी आपल्याला जिमबरोबर प्रोटीन व्यायामशाळेत (जीम) जाऊन भरपूर व्यायाम करणे तेथील प्रशिक्षकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेणे गरजेचे असते.वयानुसार सर्वांच्याच न्युट्रिशिनल गरजा वेगवेगळ्या असतात.त्यानुसारच सर्वांनी आपल्या फिटनेससाठी दिनक्रम व नियोजन करावे.फिटनेस राहण्यासाठी दररोज किमान १ तास जीम करुन सोबत न्युट्रीशन घ्या असा सल्ला आ.सुरेश धस यांनी दिला.
क-हेवडगांवचे सरपंच तथा कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक परिवंत गायकवाड यांचे चिरंजीव जयदीप गायकवाड यांच्या शिव न्युट्रीशन सप्लीमेंट अन्ड हेल्थ सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणुन बोलत होते.
यावेळी अँड.वाल्मिकतात्या निकाळजे,नगरसेवक अरुणभैय्या निकाळजे,जि.प.सदस्य सतिशआबा शिंदे,सभापती रमजान तांबोळी,सभापती बद्रीनाथ जगताप,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, डाँ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे नेते यशवंत खंडागळे, आरपीआय तालुकाध्यक्ष अशोक साळवे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,डॉ.शिवाजी राऊत,सरपंच पंडाराजे बुरूडे,माजी सरपंच गंगाधर गायकवाड,बाबासाहेब गायकवाड,अविनाश कांबळे,एन.व्हि.नागरगोजे,कुलदिप गंगावणे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,नगरसेवक सुरेश वारंगुळे,माजी नगरसेवक दिपक निकाळजे,प्रा.निखिल मिलिंद निकाळजे,अमोलराजे शिंदे,अफसर शेख,शशिकांत कन्हेरे,जावेद शेख,अस्ताक शेख,चेअरमन अरूण सायकड, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक मिलिंद निकाळजे,दिलीप राऊत,राजाभाऊ निकाळजे,संजयशेठ मेहेर,राजेंद्र मेहेर,नवीन कासवा,बाळासाहेब गोल्हार,महेंद्र घोडके,डॉ.युवराज तुपारे,राजेंद्र बोराडे,सेवानिवृत्त पीएसआय अरूण कांबळे,विठ्ठल नरवडे,रूपेश निकाळजे,ॲड.किशोर निकाळजे,कुणाल निकाळजे,इंजि.पी.बी.बोडखे,इंजी.गहिनीनाथ सिरसाठ,सादिक कुरेशी,
सरपंच अजित घुले,सुधीर पठाडे,माजी सरपंच राम धुमाळ, नवनाथ नागरगोजे,केशव बांगर,भगवान सांगळे,रावसाहेब पाटील नागरगोजे,शरद खांडवे,जालीदर खांडवे,शुभम खांडवे,गणेश टकले,बाळासाहेब खांडवे,डॉ.मच्छिंद्र खांडवे,अरूण खांडवे,हनुमान गायकवाड,संजय गायकवाड,बाळु गायकवाड,कुमार गायकवाड,आजिनाथ सांगळे,परमेश्वर सांगळे,ज्ञानेश्वर विधाते,हरि टकले,विनोद ससाणे,संतोष बोराडे,श्रीरंग सातपुते,महेश गायकवाड,दत्तु गावडे,ॲड.प्रविण डोंगरे,अमर शेख,पत्रकार मैनुद्दीन तांबोली (जामखेड),
अविनाश कदम,अनिरुद्ध धर्माधिकारी,अविशात कुमकर,अक्षय विधाते,संतोष नागरगोजे,शरद गर्जे,सलवार शेख,बळी खांडवे,श्रीधर खांडवे,लक्ष्मण बांगर,राज राऊत,सचिन ससाणे, फेरोज शेख,दादा सानप,सुधीर बचाते आदी राजकीय,सामाजिक ,धार्मिक व क्रिडा आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,आजकाल धकाधकीच्या जीवनात आजारांचा धोका वाढत आहे.त्यामुळे नागरीकांनी आरोग्याबाबत जागरूक राहिले पाहिजे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दिवसातून किमान एक तास तरी व्यायाम करावा. आपण दररोज ३० मिनिटे जीम करतो. जीममध्ये व्यायाम करणे फायद्याचे मानले जाते. त्यामुळे नागरीकांनी दररोज जिम करुन सोबत न्युट्रीशन घेतले पाहिजे.लाखात एखादी दुर्घटना घडते की, जीम करताना मृत्यू झाला परंतु यामुळे फिटनेसकडे दुर्लक्ष न करता बाकीच्या लोकांनी जिम करुन प्रोटीनसह सकस आहार घ्यावा. सकाळीचं जेवन राजासारख असलं पाहिजे तर दुपारी साधारण संध्याकाळी भिकारी म्हणजे ज्याला मिळत नाही असे जेवन केले पाहिजे असाही सल्ला आ.सुरेश धस यांनी दिला.
प्रजासत्ताकदिनी
शिव न्युट्रीशन सप्लीमेंट अँन्ड हेल्थ सेंटरचे आ.सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.उपस्थितांचे आभार जयदीप गायकवाड यांनी मानले.
0 टिप्पण्या