Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारांनी स्वतःची, कुटुंबाची जबाबदारी निश्चित करावी ----------------- जितेंद्र शिंदे

आष्टी (प्रतिनिधी) पत्रकारिता हे जबाबदारीचे क्षेत्र आहे.या क्षेत्रात काम करताना अनेक पत्रकारांना टारगेट केले जात आहे.अनेक पत्रकारांवर प्राणघातक हल्ले होत आहेत.त्यामुळे या क्षेत्राला संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे.नुकतीच छत्तीसगड राज्यात प्रतिभावान पत्रकाराची हत्या झाली.त्यामुळे आता वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी स्वतःची व कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करावी असे आवाहन धनश्री पतसंस्थेचे सचिव जितेंद्र शिंदे यांनी केले. आष्टी तालुका पत्रकार संघाच्या वतीने सोमवार दि.६ जानेवारी २०२४ रोजी पत्रकार भवनात मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन जितेंद्र शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे म्हणाले की,६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात 'दर्पण दिन' किंवा 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.अनेकांचा समज असा आहे की, ६ जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आहे.काही साईटवर तसंच म्हटलेलं आहे.हे खरं नाही.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म १८१२ मध्ये झाला असला तरी त्यांच्या जन्माची नक्की तारीख उपलब्ध नाही. १८१२ च्या उत्तरार्धात त्यांचा जन्म झाला व असावा असा अंदाज आहे. त्यांच्या मृत्यूची तारीख मात्र उपलब्ध असून १८ मे १८४६ रोजी त्याचं निधन झालं.६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी मराठीतील पहिलं वृत्तपत्र दर्पण सुरू केलं. त्याचं स्मरण म्हणून दर्पण दिन किंवा पत्रकार दिन ६ जानेवारीला साजरा केला जातो असे सांगीतले.याप्रसंगी आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,जेष्ठ पत्रकार सिताराम पोकळे,उत्तम बोडखे, प्रा.डाॅ.विनोद ढोबळे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष सानप,सचिव शरद रेडेकर,भीमराव गुरव,शरद तळेकर,रघुनाथ कर्डिले,गणेश दळवी,मनोज पोकळे यांच्यासह आदि पत्रकार उपस्थित होते.पुढे बोलतांना जितेंद्र शिंदे म्हणाले की,आज पत्रकारांवर प्राणघातक हल्ले होत आहेत.अनेकांना टारगेट केले जात आहे.त्यामुळे या क्षेत्राला तातडीने संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे.आज पत्रकारांमुळे प्रशासकीय व्यवस्थेलासुद्धा पारदर्शकता आली आहे. पत्रकारांनी निर्माण केलेला एक वैचारिक दबाव शासन व्यवस्थेला सरळ मार्गी लोकांचे प्रश्न सोडविण्यास भाग पाडत आहे. यातच पत्रकारितेचे यश सामावलेले आहे. यातून पत्रकारांनी स्वतःची व कुटुंबाची सुरक्षेबाबत जबाबदारी निश्चित करायला शिकले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.जेष्ठ पत्रकार सीताराम पोकळे म्हणाले की,मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य कै.बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' हे मराठीतले पहिले वृत्तपत्र सुरू केले.बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी,संस्कृत, बंगाली,गुजराती,
कानडी,तेलगू,फारसी,फ्रेंच,प्लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या या क्षेत्राला इतर तीन स्तंभासारखे (कायदेमंडळ न्यायव्यवस्था व कार्यकारी व्यवस्था) कोणताही स्वतंत्रपणे आधार व संरक्षण नाही. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी व भावना कळाव्यात म्हणून त्या काळी त्यांनी 'दर्पण' या मराठी वृतपत्रातून काही स्तंभ इंग्रजीमधून लिहले जात होते.आर्थिक अडचणीमुळे सात-आठ वर्षात पुढे ते सन १८४० मध्ये बंद झाले परंतु दर्पणने मराठी वृत्तपत्र व्यवस्थेचा पाया रोवला.पत्रकारिता क्षेत्र हे आजवर जबाबदारीचे राहिले आहे.गोरगरिबांवर,वंचित घटकांवर,महिला, आदिवासी विकास योजना,बालकांचे,शेतमजुरांचे प्रश्न यावर लिहिताना समस्या,कारणे व उपाय सुचवणे या माध्यमातून आणखी मोठे काम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.आज ६ जानेवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करत पत्रकार बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सुत्रसंचलन प्रा.डाॕ.विनोद ढोबळे यांनी तर आभार गणेश दळवी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या